Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike Post: '...पण अश्वत्थाम्याची जखम मात्र कायम भळभळती राहिली'; 'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत
Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike Post: 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिकेनं शो सुरू झाल्यापासूनच मोठी प्रसिद्धी मिळवली. आता सुरू झालेल्या नव्या पर्वातही कुशल त्याच जोमात सर्वांना हसवताना दिसला.

Chala Hawa Yeu Dya Fame Kushal Badrike Post: काही दिवसांपूर्वी झी मराठीवर (Zee Marathi) 'चला हवा येऊ द्या'चं (Chala Hawa Yeu Dya) नवं पर्व सुरू झालं. पण, यावेळी मात्र अनेक बदलांसह शो सुरू झाला. त्यातला महत्त्वाचा बदल म्हणजे, 'चला हवा येऊ द्या' फेम डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) आणि कॉमेडी किंग भाऊ कदम या पर्वात दिसणार नव्हते. निलेश साबळेंच्या अचानक एग्झिटमुळे मोठा गदारोळ निर्माण झालेला. अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले. मात्र, त्यानंतर स्वतः निलेश साबळेनं स्पष्टीकरण दिलं आणि कुठेतरी चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण, आता पुन्हा एकदा 'चला हवा येऊ द्या'च्या आणखी एका अभिनेत्याबाबत चिंता लागून राहिली आहे. त्यासाठी कारण ठरतेय त्यानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट.
'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता कुशल बद्रिकेनं (Kushal Badrike) शो सुरू झाल्यापासूनच मोठी प्रसिद्धी मिळवली. आता सुरू झालेल्या नव्या पर्वातही कुशल त्याच जोमात सर्वांना हसवताना दिसला. पण, सगळं छान सुरू असताना कुशलला नेमकं झालं तरी काय? अशी चिंता सर्व फॅन्सना लागून राहिली आहे. त्यासाठी कारण ठरतेय त्याची सोशल मीडिया पोस्ट. कुशलनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यानं लिहिलंय की, "श्री कृष्णाच्या करंगळीचा घाव भरायला द्रौपदी धावली. पण अश्वत्थाम्याची जखम मात्र कायम भळभळती राहिली, चिरकाल. नियती फार क्रूर असते, जखमा भरून यायला सुद्धा जन्म “कृष्णाचा” यावा लागतो." त्यासोबतच कुशल बद्रिकेनं सूर्यास्त बघत असलेला एक खास फोटो पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नवं पर्व नव्या बदलांसह प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पण, तरीसुद्धा जुन्या चेहऱ्यांना प्रेक्षक मिस करत आहेत. 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात कुशल बद्रिकेसह, गौरव मोरे, श्रेया बुगडे, प्रियदर्शन जाधव झळकत आहेत. तर, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिजीत खांडकेकरकडे सोपवण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























