एक्स्प्लोर
Remo Dsouza Heart Attack : रुग्णालयातही रेमोचा जलवा; व्हिडीओ व्हायरल
चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थनाही केली. याच प्रार्थनांच्या बळावर रेमो आता या आजारपणातून सावरत आहे. मुख्य म्हणजे तो उपचारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच सेलिब्रिटी नृत्यदिग्दर्शक अर्थात कोरिओग्राफर आणि दिहग्दर्शक रेमो डिसूझा याला हृदयविकाराचा झटका आला Remo Dsouza Heart Attack. ज्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी या मुंबईतील नावाजलेल्या रुग्णालयात त्याला दाखल करम्यात आलं. जिथं त्याच्यावर एँजिओग्राफी करण्यात आली. रेमोला रुग्णालयात दाखल केल्याचं आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं कळताच अनेकांनीच त्याच्याप्रती चिंता व्यक्त केली.
चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थनाही केली. याच प्रार्थनांच्या बळावर रेमो आता या आजारपणातून सावरत आहे. मुख्य म्हणजे तो उपचारांना अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्तर देत आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्याची पत्नी, लिझेल डिसूझानं पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहून हेच स्पष्ट होत आहे.
Imagine Dragons च्या Believer या गाण्यावर रेमोचे पाय थिरकत असल्याचं तिनं पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. जे पाहता रेमोत दडलेला एक डान्सर त्याला या आजारपणातही शांत राहू देत नाही हेच कळत आहे.
रेमोचा हा व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या पत्नीनं सर्वांच्याच प्रार्थना आणि सदिच्छांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. पायांनी नृत्य करणं ही एक बाब आणि मनानं नृत्य करणं ही एक बाब, असं लिहित तिनं मोजक्या शब्दांमध्ये तो क्षण व्यक्त केला आहे. एक पत्नी म्हणून रेमोच्या प्रकृतीत होणारे सकारात्मक बदल आणि कलेप्रती असणरी त्याची आत्मियता अशा दोन गोष्टी या एकाच पोस्टमधून पाहायला मिळत आहेत. रेमोच्या पत्नीनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच तो व्हायरल झाला आणि चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला.View this post on Instagram
.. get well Remo .. prayers !! and thank you for your wishes https://t.co/YpB5uS9zEe
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 13, 2020
सेलिब्रिटींनाही रेमोची चिंता...
रेमोच्या तब्येतीबाबत माहिती मिळताच अनेक नावाजलेल्या सेलिब्रिटी मंडळींनी त्याच्याप्रती चिंता व्यक्त केली. बिग बी अमिताभ बच्चन यांनीही रेमोसाठी एक ट्विट केलं. जुना व्हिडीओ शेअर करत तो लवकरात लवकर या संकटातून सावरावा अशी प्रार्थना त्यांनी केली. बिग बींसह इतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांच्या प्रार्थनांच्या बळावर आता रेमो सावरत असून, येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्या नृत्यकौशल्यानं तो सर्वांनाच घायाळ करेल यात शंका नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
बीड
Advertisement