Actress Casting Couch Experience: 'सोबत झोपण्यासाठी तयार...?'; टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून दिग्दर्शकाची 'ती' अत्यंत घाणेरडी मागणी
Casting Couch Experience: 'इस प्यार को क्या नाम दूं' फेम अभिनेत्रीनं आपला कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे. तिनं सांगितलं की, बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीत तिला अत्यंत वाईट अनुभवाचा सामना करावा लागलेला.

Actress Casting Couch Experience: सिने इंडस्ट्री (Cine Industry) जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढी ती खरंच आहे का? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून सर्वांच्यात मनात गोंधळ घालतोय. कारण, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडसोबतच (BCine Industry) साऊथ इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्रींनीही सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचची काळी बाजू समोर आणत आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याकडे काम देण्यापूर्वी करण्यात आलेल्या अत्यंत घाणेरड्या मागण्यांबाबत समोर येऊन सांगितलं आहे. अलिकडेच एका टीव्ही अभिनेत्रीनं तिला चित्रपटात काम देण्यासाठी करण्यात आलेल्या घाणेरड्या मागणीचा खुलासा केला. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिला सर्वात आधी साऊथ फिल्म ऑफर करण्यात आली आणि तिच्यासमोर अत्यंत घाणेरड्या अटी ठेवण्यात आल्या.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत सांगत आहोत, तिचं नाव सनाया इराणी. हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय नाव. 'इस प्यार को क्या नाम दूं' आणि 'मिले जब हम तुम' सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीनं तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं. हॉटरफ्लायला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सनायानं सांगितलं की, तिला साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि बॉलीवूड दोन्हीमध्ये कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.
View this post on Instagram
"...त्यांच्यासोबत झोपण्यासाठी तयार आहे?"
अभिनेत्री सनाया ईरानी म्हणाली की, "साऊथचा एक व्यक्ती एका चित्रपटासंदर्भात मला भेटणार होता. मला चित्रपट करायचा नव्हता, पण तो सातत्यानं आग्रह करत होता. भेटीनंतर त्यानं सांगितलं की, आपल्याला एका पूर्ण व्यक्तीची गरज आहे. मी त्याला विचारले, 'मी पूर्ण मुलगी नाही का?' त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "अनेकदा असं दिसतं की, लोक अभिनेत्रींना फक्त हे जाणून घेण्यासाठी भेटतात की, त्या त्यांच्यासोबत झोपायला तयार आहेत का?"
बॉलिवूडमध्ये सनायानं सोसलंय कास्टिंग काऊचचं दुःख
सनाया इरानी पुढे म्हणाली की, बॉलिवूडमधील एका दिग्दर्शकानंही तिच्याकडून अशीच एक अत्यंत घाणेरडी मागणी केली होती. ती म्हणाली की, "मी जेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा त्यांनी मला अर्ध्या तासात परत फोन करायला सांगितलं. त्यामुळे मी 45 मिनिटांनी पुन्हा फोन केला. त्यानं मला वारंवार वेळ विचारला. मला त्याचा दृष्टिकोन समजू लागला आणि मला जाणवलं की, तो माझा सातत्यानं अपमान करण्याचा प्रयत्न करत आहे."
अभिनेत्री पुढे म्हणाली की, "त्यानं सांगितलं की, मी अनेक मोठ्या सेलिब्रिटींना घेऊन एक मोठा चित्रपट बनवतोय आणि त्यासाठी तुला बिकिनी घालावी लागेल. जेव्हा मी माझ्या पात्राबद्दल विचारलं, तेव्हा त्यानं चुकीचा आग्रह धरला आणि विचारलं की, मी बिकिनी घालण्यास तयार आहे का? मी कॉल डिस्कनेक्ट केला."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























