एक्स्प्लोर

June 2025 OTT Released: जूनमध्ये OTT वर धमाल, 'केसरी 2'पासून 'ग्राऊंड झिरो'पर्यंत 4 फिल्म्सची मेजवाणी; कधी आणि कुठे पाहाल?

June 2025 OTT Released: जून महिन्यात चार हिंदी चित्रपट ओटीटीवर येणार आहेत. 'सितारे जमीन पर', 'हाऊसफुल 5' आणि 'माँ' सारखे सिनेमे थिएटरमध्ये वर्चस्व गाजवतील, तर 'केसरी चॅप्टर 2'पासून 'ग्राउंड झिरो'पर्यंतचे चार चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालतील.

June 2025 OTT Released: ओटीटी आल्यामुळे आता मनोरंजन आपल्या हातात आल्याचं अनेकजण बोलतात. ओटीटीमुळे तुम्ही हवं तेव्हा, हवं तिथे, हवा तो सिनेमा पाहू शकता. अशातच, जून महिना ओटीटीवर मनोरंजनाची मेजवाणी घेऊन आला आहे. जून 2025 मध्ये, अक्षय कुमारचा मल्टीस्टारर 'हाऊसफुल 5', आमिर खानचा 'सितारे जमीन पर' आणि काजोलचा 'माँ' हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहेत. तर, 4 नवे सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार आहेत. यापैकी तीन चित्रपटांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रशंसा मिळवली आहे, तर एक थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.

Stolen – June 4 (Prime Video)

जून 2025 ची सुरुवात ओटीटीवरील एका क्राईम-थ्रिलरनं होईल. अभिषेक बॅनर्जी आणि हरीश खन्ना स्टारर क्राईम-थ्रिलर 'स्टोलन' हा चित्रपट 4 जून रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. करण तेजपाल दिग्दर्शित या चित्रपटाशी अनुराग कश्यप, किरण राव, निखिल अडवाणी आणि विक्रमादित्य मोटवानी देखील जोडले गेले आहेत. हे चौघेही या सिनेमाचे  एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर्स आहेत. या चित्रपटानं व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल, बीजिंग इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि जपानच्या स्किप सिटी इंटरनॅशनल डी-सिनेमा फेस्टिव्हल तसेच झुरिच फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रशंसा आणि अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

'स्टोलन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची कथा दोन भावांभोवती फिरते, जे राजस्थानच्या ग्रामीण भागातील रेल्वे स्टेशनवर एका मुलीचं अपहरण होताना पाहतात. ते मुलीच्या गरीब आईला मदत करण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रक्रियेत त्यांना दहशत आणि गुन्हेगारीच्या अशा जगाचा सामना करावा लागतो, जिथे अंधार आणि अराजकतेशिवाय काहीही नसतं.

Jaat - June 6 (Netflix)

सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांचा 'जाट' हा चित्रपट एप्रिल महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फक्त 88.61 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन करू शकला. पण सनी पाजीच्या चाहत्यांना चित्रपटातील त्याचा अंदाज खूपच आवडला. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित हा चित्रपट 6 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.

'जाट' चित्रपटाची कथा 2009 च्या तमिळ गृहयुद्धानंतरच्या घटनांवर आधारित आहे. रणतुंगा हा एक भयानक गुन्हेगार आहे. तो आणि त्याची टोळी चोरीला गेलेला खजिना घेऊन श्रीलंकेतून भारतात पळून जातात. या टोळीनं हळूहळू तीस गावांवर दहशतीचे राज्य स्थापित केलं आहे. वर्षांनंतर, एक अनामिक अनोळखी व्यक्ती या गावात पोहोचते. तो अन्यायाविरुद्ध लढतो.

Kesari Chapter 2 – June 13 (JioHotstar)

करण सिंह त्यागी दिग्दर्शित 'केसरी चॅप्टर 2' अजूनही थिएटरमध्ये आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं 38 दिवसांत 92.02 कोटी रुपयांचं नेट कलेक्‍शन केलं आहे. दुर्दैवानं, या चित्रपटात अक्षय कुमार, आर माधवन आणि अनन्या पांडे यांचे खूप कौतुक झालं असलं तरी, 150 कोटी रुपयांच्या बजेटमुळे तो हिट ठरू शकला नाही. दरम्यान, आता हा चित्रपट 13 जून रोजी ओटीटीवर देखील प्रदर्शित होत आहे. तुम्ही तो जिओ हॉटस्टारवर पाहू शकाल.

'केसरी चॅप्टर 2'ची कहाणी इतिसाहातील एका अशा घटनेवर आधारीत आहे, जी घटना आठवली तरी आजही अंगावर सर्रकन काटा येतो. ही कहाणी वकील सी. शंकरन नायर यांची आहे. ज्यांनी जलियांवाला बाग हत्‍याकांडानंतर ब्रिटीश राजवटीला कोर्टात खेचलेलं. त्यांनी ब्रिटीश सरकारला आपली चूक मान्य करुन पीडितांच्या कुटुंबीयांची माफी मागायला भाग पाडलेलं. 

Ground Zero – June 27 (Prime Video)

तेजस प्रभा विजय देओस्कर दिग्दर्शित 'ग्राउंड झिरो' हा देखील एक चित्रपट आहे, ज्याचं खूप कौतुक झालं. पण, तो बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. इमरान हाश्मी स्टारर हा चित्रपट 25 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्यानं फक्त 7.74 कोटी रुपयांचं लाईफटाईम कलेक्शन केलं. आता तो ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 'ग्राउंड झिरो' 27 जून रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

'ग्राउंड झिरो'ची कथा बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ धर दुबे यांच्या जीवनावर आहे. त्यांनी 2003 मध्ये झालेल्या ऑपरेशनचं नेतृत्व केलं होतं ज्यामध्ये दहशतवादी राणा ताहिर नदीम उर्फ ​​गाजी बाबा मारला गेला होता. हा तोच दहशतवादी होता, ज्यानं 2001 मध्ये भारतीय संसदेवर बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Aamir Khan on Ex-Wives and Girlfriend: 'आम्ही पती-पत्नी होऊच शकत नाही...'; गर्लफ्रेंड गौरी आणि एक्स वाईफ्सबाबत काय म्हणाला आमिर खान?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget