एक्स्प्लोर

Cannes Film Festival 2023 live updates:'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात ; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Cannes Film Festival : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात होत आहे. या फिल्म फेस्टिव्हलचे सर्व अपडेट्स जाणून घ्या...

LIVE

Key Events
Cannes Film Festival 2023 live updates:'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात ; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

Background

Cannes Film Festival : जगभरातील सिनेप्रेमींसाठी महत्त्वाचा असणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'ला (Cannes Film Festival 2023) आजपासून सुरुवात होत आहे. 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. 16 मे ते 27 मे या कालावधीत कान्स फिल्म फेस्टिव्हल पार पडणार आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' कुठे पार पडणार?

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'चं आयोजन फ्रान्समधील फ्रेंच रिवेरा येथे होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सिनेमे दाखवले जाणार आहेत. या फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटी आपल्या अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.  16 मे 2023 पासून यंदाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' सुरू होणार आहे. 16 मे पासून सुरू होणारा हा फेस्टिव्हल 27 मे पर्यंत सुरू राहणार आहे. 

सेलिब्रिटींशिवाय पत्रकार आणि चित्रपट समीक्षकही कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना लाखो रुपये खर्च करुन तिकीट काढावे लागणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठीची तिकीटाची किंमत पाच लाख ते 20 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्याच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तिकीट बुक करता येते. 

जगातील सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सर्वांना उत्सुकता आहे. 16 मेपासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात जगभरातील अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. बॉलीवूड सिनेसृष्टीतील ऐश्वर्या राय बच्चन आणि दीपिका पदुकोण दरवर्षी या महोत्सावाला हजेरी लावत असतात. यावर्षी अनुष्का शर्मा यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे.  अनुष्कासह हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेटदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे.तसेच मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लरदेखील कान्सच्या रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीदेखील कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. सनी पहिल्यांदाच कान्समध्ये सहभागी होणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक अनुराग कश्यप कान्समध्ये हजेरी लावणार आहे.

'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023'मध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी खास ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. तसेच या ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. महिला कॉकटेल ड्रेस परिधान करू शकतात. ब्लॅक टॉप, ब्लॅक ट्राउजर किंवा भडक रंगाची फॉर्मल ट्राउजर महिला परिधान करू शकतात. तर दुसरीकडे या पुरुषांना डिनर जॅकेट किंवा सूट परिधान करावे लागतील. तसेच या ड्रेसवर शूजदेखील घालावे लागणार आहेत.

10:34 AM (IST)  •  23 May 2023

Cannes Film Festival 2033 : सनी लिओन तिच्या कान्स मधल्या पहिल्या वहिल्या लूकने प्रेक्षकांची मन जिंकतेय

Cannes Film Festival 2033 : बॉलीवूडच्या विश्वात सनी लिओनीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तिने तिच्या कारकिर्दीत आणखी एक उंची गाठली आहे. आता 'कान्स 2023'मध्येदेखील अभिनेत्रीने हजेरी लावली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

09:02 AM (IST)  •  22 May 2023

Drishyam : अजयच्या 'दृश्यम'चा कोरिअन भाषेत होणार रिमेक; 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान घोषणा

Drishyam Franchise Remake In Korea : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि तब्बूचा (Tabu) बहुचर्चित 'दृश्यम' (Drishyam) या सिनेमासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 'दृश्यम'च्या हिंदी रिमेकने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता या सिनेमाचा कोरिअन (Korea) भाषेत रिमेक होणार आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'दरम्यान (Cannes Film Festival 2023) ही घोषणा करण्यात आली आहे. 

09:54 AM (IST)  •  21 May 2023

'Cannes 2023'मध्ये मृणाल ठाकूरचा फ्यूजन लूक

'Cannes 2023'मध्ये मृणाल ठाकूरचा फ्यूजन लूक पाहायला मिळाला. तिचा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला. 

View this post on Instagram
 
A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

11:31 AM (IST)  •  20 May 2023

Aishwarya rai Bachchan red carpet look : तुझ्यापेक्षा तुझा सासरा बरा... कान रेड कार्पेटवरील लूकमुळे ट्रोल होतेय ऐश्वर्या

Aishwarya rai Bachchan red carpet look- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. तिचा कान फिल्म फेस्टिव्हल 2023चा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याला एक नवीन ट्विस्ट मिळाला आहे. लोक तिची तुलना तिचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या जुन्या फोटोशी करू लागले आहेत.

09:03 AM (IST)  •  20 May 2023

'Cannes 2023'मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले; ट्वीट करत म्हणाले...

Cannes 2023 : 'Cannes 2023'मधील ऐश्वर्या रायचा लूक बघून विवेक अग्निहोत्री भडकले आहेत. ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे,"तुम्ही ‘पोशाख गुलाम’ हा शब्द ऐकला आहे का? त्या बहुतेक मुली असतात. तुम्ही त्याला आता भारतातील जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटींबरोबर पाहू शकता. अशा अस्वस्थ फॅशनसाठी आपण इतके मूर्ख आणि दडपशाही का बनत आहोत?’ ऐश्वर्या रायने परिधान केलेल्या गाऊन मागून एवढा मोठा होता की त्याला सांभाळण्यासाठी एक माणूस उभा होता. यावरुनच अग्निहोत्रींनी टीका केली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget