एक्स्प्लोर

Bunny : ‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग!

Bunny : जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे.

Bunny : जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी, सायंकाळी टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या. त्यातून 137 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डू' आणि मराठीतील 'बनी' या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली.

येत्या 26 व 27 ऑगस्ट 2022 रोजी हा महोत्सव अमेरिकेतील आर्कान्सा, फोर्ट स्मिथ, यूएसए, संपन्न होणार आहे. साय-फाय, ड्रामा, कॉमेडी, थ्रिलर, ऍक्शनसह इतर अनेक शैलींतील 30हून अधिक देशांच्या विविधरंगी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन ‘फोर्थ स्मिथ’च्या 'बॉर्डरलँड्स' मध्ये दर्शन होणार आहे.

काय आहे ‘बनी’चं कथानक?

‘बनी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल लेखक दिग्दर्शक निलेश उपाध्ये सांगतात की, ‘विवेक नावाच्या व्यक्तीने 10 वर्षाच्या बनीला जगापासून दूर, अलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतु, त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे.’

बनी सातासमुद्रा पार!

अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल बोलताना ते म्हणले की, ‘विलक्षण कथा आणि उत्तम टीमवर्कमुळे आज 'बनी' सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषय, दिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने डीओपी कार्तिक काटकर यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे म्हणता येईल.’

‘बनी’च्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजेसोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे. कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं असून, साउंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. ‘बनी’चं संकलन योगेश भट्ट याचं असून, पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे.

हेही वाचा :

Bunny : 'बनी' देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये! आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही मारली बाजी!

Bunny : मराठी चित्रपटांचे पाऊल पडते पुढे! थेट कान्सच्या व्यासपीठावर दिसली 'बनी'ची पहिली झलक!

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Amol Kolhe on CJP Laathicharge: 'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल
Kriti Sanon : बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
बॉयफ्रेंडसोबत IND vs ENG  पाहायला पोहोचली कृती सेनन; धोनीच्या लेकीसोबतची धमाल चर्चेत
Diljit Dosanjh on CJP Student Protest: शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरलेला गायक आता CJP आंदोलनात; दिलजीत दोसांझची पोस्ट चर्चेत, म्हणाला...
Sonakshi Sinha On CJP Protest : '20 जुलै लक्षात ठेवा..अनेकांची हाडं मोडली, देशाचंही मन तुटलं'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो 
'20 जुलै लक्षात ठेवा..'; जंतरमंतर आंदोलनानंतर सोनाक्षी सिन्हाने शेअर केले अस्वस्थ करणारे फोटो, म्हणाली..

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधी आंदोलनावर ठाम, रात्रभर पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर करणार ठिय्या, मोदींसह अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
Embed widget