एक्स्प्लोर

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?

'जननायक'ने मंगळवारी तमिळ हिंदी आणि तेलगू अशा तीनही भाषांमध्ये केवळ आठ कोटी रुपयांची कमाई केली.

Box office collection: मंगळवारचा दिवस बॉक्स ऑफिसवर 'जननायक' साठी फारसा चांगला नव्हता.थलपती विजय मुख्यमंत्री झाल्यानंतर मनोरंजन सृष्टीतील त्यांचा हा शेवटचा चित्रपट मानला जातोय. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईला मंगळवारी ब्रेक लागला. याउलट 'धमाल 4','द ओडिसी'ला प्रेक्षकांनी पसंती दिली.त्यामुळे थलपती विजय यांचा शेवटच्या चित्रपटाची वाट आणखी कठीण झालीय. हिट होण्यासाठी या चित्रपटाला आपलं स्थान मजबूतपणे टिकवून ठेवावे लागणार आहे.

'जननायकन'च्या कमाईला ब्रेक ..

एच विनोद दिग्दर्शित 'जननायकन' पूर्णपणे थलपती विजय यांच्या चाहता वर्गासाठी बनवण्यात आलेला सिनेमा आहे. चाहते आणि समीक्षक दोघांकडूनही या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने 150 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये झालेल्या या चित्रपटाला हिट होण्यासाठी अजून निम्मी कमाई करणं बाकी आहे.

सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार, 'जननायक'ने मंगळवारी तमिळ हिंदी आणि तेलगू अशा तीनही भाषांमध्ये केवळ आठ कोटी रुपयांची कमाई केली. तब्बल 10 हजार 413 शो देशभरात लागले होते. प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी तिकीट स्वस्थ असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली नाही. सोमवारी 21.7% पेक्षा कमी असणाऱ्या प्रेक्षक उपस्थितीपेक्षाही मंगळवारची प्रेक्षक संख्या कमी होती. सहा दिवसात या चित्रपटाने भारतात 167.57 कोटींची कमाई केली आहे.  तर परदेशात 78.50 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी मिळून जगभरातील एकूण कमाई 446 कोटींवर गेली आहे.

या चित्रपटाने पहिल्या दिवशी 42.70 कोटी रुपयांची कमाई करत सुरुवात केली होती. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवारी ही 21.15 कोटींची कमाई केली. शनिवारी ही कमाई 28.90 कोटींवर गेली होती. रविवारी 32 कोटी कमावल्यानंतर सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी 10.65 कोटी आणि आठ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पण विकडे असल्यामुळे हा ब्रेक लागल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. वीकेंडला हा चित्रपट आणखी कमाई करू शकतो असा अंदाज आहे.

'धमाल 4 'ने बॉक्स ऑफिस गाजवलं..

अजय देवगन, अर्शद वारसी आणि रितेश देशमुख यांचा प्रमुख भूमिका असणाऱ्या धमाल 4 चित्रपटाने भारतात 182.32 कोटी रुपये कमावले आहेत. तर परदेशात या चित्रपटाची कमाई 29.45 कोटी रुपये झाली आहे. जगभरात या चित्रपटाने 211. 77 कोटी रुपये कमावलेत. इंद्रकुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे बजेट 200 कोटी रुपये होतं.

द ओडिसीची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई

ख्रिस्तोफर नोलनचा भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा द ओडिसी जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने जगभरात सहा हजार चारशे कोटी रुपयांची कमाई केली असून भारतात केवळ 12 दिवसांमध्ये 127.65 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं बजेट 21.5 अब्ज आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Yashpal Sharma on Ladoo: 'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
'लाडू' पाहून यशपाल शर्मा भावुक, सिनेमाचं भरभरुन कौतुक; म्हणाले, 'आजच्या काळात असा चित्रपट बनवणं...'
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Embed widget