Zwigato Trailer : हम मजदूर हैं , इस लिए मजबूर हैं.! कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत, Zwigato चा ट्रेलर लाँच
Zwigato Trailer : लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल शर्मा या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे.
Zwigato Trailer : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कपिल शर्माच्या आगामी ‘झ्विगॅटो’ (Zwigato) या चित्रपटाचे ट्रेलर रिलिज झाले आहे. या चित्रपटातील कपिल शर्मा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूक आधीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात कपिल शर्माची वेगळी शैली पाहायला मिळणार आहे.
लोकांना नेहमी खळखळवून हसवणारा कपिल शर्मा या चित्रपटात एका सामान्य माणसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो आयुष्यातील अनेक संकटांना तोंड देताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री शहाना गोस्वामी कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. मजबूर है इसिलिय मजदूर है... हा कपिल शर्माचा या ट्रेलरमधील डायलॉग खूप काही सांगून जातो.
आपल्या धमाकेदार कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कपिल शर्मा या चित्रपटात पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहे. 'झ्विगॅटो'चे दिग्दर्शन नंदिता दास यांनी केले आहे. यात कपिल शर्मासोबत अभिनेत्री शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता.
पाहा ट्रेलर
ट्रेलरमध्ये कपिल शर्माच्या कुटुंबाची झलकही दाखवण्यात आली आहे. आपल्या कुटुंबाच्या गरजांसाठी सर्वसामान्य व्यक्ती रात्रंदिवस काम कसं करतो. हे चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. एक सीन ट्रेलरमध्ये येतो, जिथे कपिल म्हणतो की, आज मी 10 डिलिव्हरी करणार आहे. मात्र, जेव्हा कपिलची पत्नी शहाना देखील कामावर जायला सुरुवात करते, तेव्हा कुटुंबात नवीन वाद सुरू होतात. यानंतर सामान्य कुटुंबाप्रमाणे कपिलच्या घरातही वाद सुरू होतो.
View this post on Instagram
काय आहे कथानक?
'झ्विगॅटो' ची कथा एका अशा अधिकाऱ्याची आहे, जो एका कंपनीत मॅनेजर आहे, ज्याची नोकरी साथीच्या आजाराच्या काळात गेली आहे. या काळात आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो व्यक्ती डिलिव्हरी बॉयचे काम करू लागतो. या चित्रपटातून सामान्य डिलिव्हरी बॉयच्या समस्या मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहेत. 17 मार्च रोजी चित्रपटग्रहात ‘झ्विगॅटो’ (Zwigato) रिलिज होणार आहे.
आणखी वाचा :
यंदाचा उन्हाळा घामटा काढणार, मार्च ते मे महिन्यात अंगाची लाहीलाही होणार