झीनत अमान यांची खास पोस्ट; आठवणींना उजाळा देत म्हणाल्या, 'हा मार्च महिना...'
झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

Zeenat Aman: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) या त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षत्रकांची मनं जिंकतात. 1970 च्या दशकातील ग्लॅमरस अभिनेत्री, अशी त्यांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वी झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. नुकातीच त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
झीनत अमान यांनी 1977 मध्ये रिलीज झालेल्या ‘आशिक हूं बहारों का’ (Aashiq Hun Baharon Ka) या चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला. त्यांनी शेअर केलेल्या या ब्लॅक अँड व्हाईट फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले.
झीनत अमान यांची पोस्ट
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्या कूल लूकमध्ये दिसत आहे. 'नेहमी भरारी घेत राहा. सर्वांचा हा मार्च महिना अॅडव्हेंचर आणि आनंदी जावो. आशिक हूं बहारों का चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा 1977 चा फोटो' असं कॅप्शन या फोटोला झीनम अमान यांनी दिलं. जे. ओम प्रकाश यांनी ‘आशिक हूं बहारों का’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.
सेलिब्रिटींनी केल्या कमेंट्स
झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. अर्चना पूरन सिंह, शिल्पा शेट्टी यांनी झीनत अमान यांनी शेअर केलेल्या फोटोला कमेंट्स केल्या. झीनत या सोशल मीडियावर सध्या सक्रिय आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर 99.7k एवढे फॉलोवर्स आहेत.
View this post on Instagram
झीनत अमान यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम
‘हरे रामा हरे कृष्णा’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘डॉन’, ‘कुर्बानी’, ‘दोस्ताना’, ‘धर्म वीर’, ‘यादों की बारात’ आणि‘लावारिस’ यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये झीनत अमान यांनी काम केलं. झीनत अमान यांचा 1978 मध्ये सत्यम शिवम सुंदरम हा आयकॉनी चित्रपट आजही प्रेक्षक आवडीनं बघतात. या चित्रपटात झीनत अमान यांच्यासोबतच शशी कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांनी देखील काम केले.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री; पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
