Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री; पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा
झीनत अमान (Zeenat Aman) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
![Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री; पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा Bollywood actress zeenat aman makes instagram debut dropped beautiful picture Zeenat Aman: झीनत अमान यांची सोशल मीडियावर एन्ट्री; पोस्टद्वारे दिला जुन्या आठवणींना उजाळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/13/45b1743d7726bd2d95767d4a4cef10581676288490534259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Zeenat Aman: 70-80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. झीनत अमान यांनी सोशल मीडियावर (Social Media) एन्ट्री केली आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर अकाऊंट क्रिएट केलं आहे. झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट देखील शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
झीनत अमान यांची पहिली पोस्ट
झीनत अमान यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील पहिल्या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्या ब्लॅक अँड व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहेत. या पोस्टला त्यांनी कॅप्शन दिलं, 'हॅलो, इन्स्टाग्राम' झीनत अमान यांना इन्स्टाग्रामवर सध्या 12 हजारपेक्षा जास्त नेटकरी फॉलो करत आहेत.
झीनत अमान यांनी आणखी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं, '70 च्या दशकात चित्रपट आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये पुरुषांचे वर्चस्व होते. सेटवर मी एकटीच महिला आहे, असं मला वाटायचं. माझ्या कारकिर्दीत मी अनेक प्रतिभावान पुरुषांना चित्रीकरण करताना पाहिलं आहे. पण स्त्रीची नजर मात्र वेगळी असते. फोटोची ही सीरिज युवा फोटोग्राफर तान्या अग्रवालनं शूट केली आहे. लाईट, मेकअप आणि स्टाईलिश नसताना, माझ्या घरी हे फोटो काढण्यात आले आहेत. अनेक तरुण मुलींना असं काम करताना पाहून मला आनंद होतो.'
View this post on Instagram
शेअर केला आईसोबतचा फोटो
झीनम अमान यांनी त्यांच्या आईसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानी कॅप्शन दिलं, 'माझी आई ही हुशार, सुंदर आणि माझा आधारस्तंभ होती. 2005 च्या मुंबईच्या पुरात मी माझे कौटुंबाचे फोटो गमावले. म्हणून जे काही फोटो मला सापडले ते माझ्यासाठी अधिक मौल्यवान आहेत.'
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
दुसऱ्यांदा आई होणार पॉप सिंगर रिहाना; परफॉर्मन्स दरम्यान फ्लॉन्ट केला होता बेबी बंप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)