Dum Maro Dum: देव आनंद आणि झीनत अमान यांच्या चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावर सरकारने 'का' बंदी घातली होती?
Dum Maro Dum: 'हरे रामा हरे कृष्णा' (Hare Rama Hare Krishna) चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती.
Dum Maro Dum: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते देव आनंद (Dev Anand) आणि अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली.या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट काम करुन मनावर राज्य केले. देव आनंद आणि झीनत अमान यांनी 1971 मध्ये रिलीज झालेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट देव आनंद यांनीच दिग्दर्शित केला होता. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटातील 'हरे रामा हरे कृष्णा' (Hare Rama Hare Krishna) चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली होती. देव आनंद आणि झीनत अमान यांच्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटावर का बंदी घातली होती? याबाबत जाणून घेऊयात...
झीनत अमान आणि देव आनंद यांच्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटातील गाण्यांना आरडी बर्मन यांनी संगीत दिले. ही गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. 'दम मारो दम' हे गाणे आशा भोसले यांनी गायले होते. या गाण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आरडी बर्मन आणि आनंद बक्षी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, भारत सरकारने या गाण्यावर बंदी घातली होती.
बंदी घालण्यामागील कारण काय?
प्रभू रामाचे नाव 'दम' या शब्दासोबत जोडण्यात आल्यामुळे या गाण्यावर सरकारनं आक्षेप घेतला होता. त्यामुळे सुरुवातीला आकाशवाणी आणि डीडीने या गाण्यावर बंदी घातली होती. या गाण्यामुळे देशात हिप्पी संस्कृतीला चालना मिळेल असं भारत सरकारला वाटले होते. मात्र, बऱ्याच संघर्षानंतर हे गाणं रिलीज करण्यात आले.
'हरे रामा हरे कृष्णा' चित्रपटातील कलाकार
1971 मध्ये रिलीज झालेल्या 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटातील 'दम मारो दम' या गाण्यासाठी गायिका आशा भोसले यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 'दम मारो दम' आजही अनेक पार्ट्यांमध्ये लावले जाते ज्यावर तरुणाई थिरकते. 'हरे रामा हरे कृष्णा' या चित्रपटात मुमताज यांनी शांती ही भूमिका साकारली होती. तसेच ज्युनियर मेहमुद आणि प्रेम चोप्रा यांनी देखील या चित्रपटात काम केलं होतं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: