Armaan Malik : दोन्हीही पत्नी प्रेग्नेंट असणाऱ्या युट्यूबरनं ट्रोलर्सला सुनावले खडे बोल, म्हणाला, 'मला फरक पडत नाही...'
नुकत्याच एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमाननं (Armaan Malik) त्याच्या पत्नींच्या प्रेग्नन्सीवरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
Armaan Malik: गेल्या काही दिवसांपासून युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) हा चर्चेत आहे. कृतिका आणि पायल या आरमानच्या दोन्ही पत्नी प्रेग्नंट आहेत. त्यामुळे सध्या अनेक नेटकरी अरमानला ट्रोल करत आहेत. नुकत्याच एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमाननं त्याच्या पत्नींच्या प्रेग्नन्सीवरुन ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाला अरमान?
एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरमानला ट्रोलर्सबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अरमान मलिक म्हणाला, 'हजार लोक कमेंट करत असतात. लोक माझे व्लॉग बघतात. ज्यांचे विचार छोटे असतात ते अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स करतात. मी माझ्या कुटुंबाचे कोणतेही फोटो शेअर करेल. ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्समुळे मला काहीच फरक पडत नाही. '
पुढे मुलाखतीमध्ये अरमानची पत्नी कृतिकानं पायलच्या प्रेग्नन्सीबाबत सांगितलं. ती म्हणाली, 'पायलच्या (अरमानची पत्नी) शरीरात एक फॅलोपियन ट्युब आहे. महिलांच्या शरीरात दोन फॅलोपियन ट्युब असतात. त्यामुळे डॉक्टरांनी तिला IVF ट्राय करायला सांगितलं होतं. पायच्या IVF चा पहिला रिझल्ट निगेटिव्ह ठरला त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी माझा प्रेग्नन्सी रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यानंतर पायलनं पुन्हा IVF ट्राय केलं. त्यानंतर पायलचा IVF रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आम्ही दोघी एकाच वेळी प्रेग्नंट झालो. आमच्या दोघींच्या प्रेग्नन्सीमध्ये एक महिन्यांचा फरक आहे.'
View this post on Instagram
अरमान मलिक हा प्रसिद्ध युट्यूबर आहे. तो युट्यूबवर त्याचे व्लॉग अपलोड करतो. अरमाननं पायलसोबत 2011 मध्ये लग्न केले. त्यानंतर त्यानं 2018 मध्ये कृतिकासोबत लग्न केलं. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: