Armaan Malik : अरमान मलिकचं हम तीन हमारे पाँच? आता कोणत्या बायकोच्या बेबी शॉवरची तयारी?
Youtuber Armaan Malik Wife Pregnant : युट्यूबर अरमान मलिक पुन्हा एकदा बाबा होण्यासाठी सज्ज आहे. अरमान मलिकची पत्नी दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. त्यामुळे अरमान आता पाचव्यांदा बाबा होणार आहे.
Youtuber Armaan Malik Wife Pregnant : युट्यूबर अरमान मलिक (Armaan Malik) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अरमान पुन्हा एकदा बाबा होण्यासाठी सज्ज आहे, असे म्हटले जात आहे. अरमानची पत्नी प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे. पण अरमानची कोणती पत्नी पुन्हा प्रेग्नंट आहे याचा अद्याप खुलासा झालेला नाही. अरमान मलिकने एक नवा व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये तो पत्नीसोबत बेबी शॉवर सेलिब्रेट करताना दिसून येत आहे.
अरमान मलिकची कोणती पत्नी प्रेग्नंट?
अरमान मलिकने शेअर केलेल्या बेबी शॉवरच्या फोटोंमध्ये त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका आणि पायल दिसून येत आहेत. व्हिडीओमध्ये पायल म्हणते,"आम्ही बेबी शॉवरला आलो आहोत. आता नक्की कोणाचं बेबी शॉवर आहे याचा तुम्ही अंदाज बांधा. माझं की कृतिकाचं". पायल पुढे म्हणते,"तुम्ही विचार करणं ही कल्पना खूप छान आहे. कारण असं सांगायला लाज वाटते".
अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार?
व्हिडीओमध्ये कृतिका आणि पायलसोबत एक केकदेखील दिसून येत आहे. या केकवर डॅडी असं लिहिलेलं दिसत आहे. तसेच मागे वेलकम बेबीचा बॅनरदेखील झळकत आहे. या सगळ्यावरुन हा बेबी शॉवरचा व्हिडीओ असल्याचं कळत आहे. पायल आणि कृतिकापैकी नक्की कोण प्रेग्नंट आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण अरमानच्या दोन पत्नींपैकी एक पत्नी प्रेग्नंट असल्याचं वृत्त खरं आहे. त्यामुळे आता अरमान मलिक पाचव्यांदा बाबा होणार आहे.
View this post on Instagram
अरमान मलिकने काही दिवसांपूर्वी पहिली पत्नी पायक मलिकसोबत दुसरं लग्न केलं होतं. या लग्नात त्याची दुसरी पत्नी कृतिका आणि त्यांचे मुलंही सहभागी झाले होते. युट्यूबरची पत्नी पायल मलिकने आयवीएफच्या मदतीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तसेच पायलचा एक मोठा मुलगादेखील आहे. याआधी पायलने सांगितलं होतं की, तिने आणि कृतिकाने एकत्र दोनवेळा आयव्हीएफ केलं होतं. पण त्यावेळी ते फेल झालं. अखेर तिसऱ्यांदा आयव्हीएफ यशस्वी झालं.
'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये झळकणार अरमान मलिक!
अरमान मलिक 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये झळकणार आहे. अरमान आधी पायलसोबत लग्नबंधनात अडकला होता. त्यानंतर त्याने पायलची मैत्रिण कृतिकासोबत दुसरं लग्न केलं. अरमान आपल्या दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहतो.
संबंधित बातम्या