एक्स्प्लोर
सिनेमाच्या ऑडिशनदरम्यान 'आई' म्हणत तरुणाने प्राण सोडले

पंढरपूर : चित्रपटात हिरो होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ऑडिशनला आलेल्या एका तरुणाला, हे स्वप्न चांगलंच महागात पडलं आहे. पंढरपुरात ऑडिशन देताना खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये 'गाजर' चित्रपटाची ऑडिशन सुरु होती. यावेळी बीडचा प्रफुल्ल बोखारे हा तरुणही आला होता. त्याला दिलेल्या डायलॉगनुसार 'आई...' अशी आरोळी त्याने दिली आणि तो खाली पडला, त्याचवेळी त्याचा मृत्यू झाला. तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून त्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
महाराष्ट्र























