Yogesh Soman: अभिनेते योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल; म्हणाले, 'द केरळ स्टोरी चित्रपटाची वनलाईन रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली...'
अभिनेते योगेश सोमण (Yogesh Soman) यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Yogesh Soman: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण (Yogesh Soman) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे. योगेश सोमण यांच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
व्हिडीओमध्ये योगेश सोमण म्हणतात, "नमस्कार, दोन दिवसांपूर्वी 'द केरळ स्टोरी' या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. नेटवर किंवा इतर माध्यमांवर या चित्रपटावरुन गदारोळ उठला. कहीजणांनी त्याचं गांभीर्य लोकांना सांगितलं… काही लोकांनी त्याची सत्य – असत्यता याबाबत आपले विचार मांडले आणि अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी-सुलतानीच्या चार ओळी आल्या. मी तर असं म्हणतो की, द केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामी यांनी लिहून ठेवलेली आहे.
किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या।
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या।
कितीयेक देशांतरी त्या विकील्या।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।
या त्या चार ओळी आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे."
पाहा व्हिडीओ:
व्हिडीओमध्ये योगेश सोमण यांनी शांमुखी या शब्दाचा आणि फाकवील्या या शब्दाबाबत देखील सांगितलं. ते म्हणाले, शांमुखी हा शब्द शहामुखी नावाच्या शब्दाचा अपभ्रंश आहे. फाकवील्या म्हणजे पाठवल्या. योगेश सोमण यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
योगेश सोमण यांचे चित्रपट
वेगळी वाट, अनन्या, अनंदी गोपाळ, फास्टर फेणे या मराठी चित्रपटांमध्ये योगेश सोमण यांनी काम केलं आहे. तर उरी आणि दृष्यम सारख्या हिंदी चित्रपटात देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
'द केरळ स्टोरी' या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धि इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये 'द केरळ स्टोरी' या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: