मामा गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यावर कृष्णा कार्यक्रमात का दिसला नाही?
एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले की मामा गोविंदा सोबत त्याचे चांगले संबंध होते. पण, शत्रुत्वाचा त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम झाला.
![मामा गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यावर कृष्णा कार्यक्रमात का दिसला नाही? Why didnt Krishna Abhishek perform in The Kapil Sharma Show in the presence of Govinda मामा गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये आल्यावर कृष्णा कार्यक्रमात का दिसला नाही?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/16222406/govinda.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अभिनेता गोविंदाने गेल्या रविवारी लोकप्रिय टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये हजेरी लावली. यात कपिल शर्मा, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर यांनी गोविंदाबरोबर खूप मस्ती घातली. पण यावेळी गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेक दिसला नाही. तो शोमधून गायब झाला. आता नुकत्याच झालेल्या मुलाखतीत कृष्णाने त्यामागील कारण दिले आहे.
एका मुलाखतीत कृष्णाने सांगितले, की त्याचं त्याच्या मामाशी घट्ट नातं आहे. मात्र, वादामुळे त्यांच्या नात्यावर वाईट परिणाम झाला. तो म्हणाला, "मी दहा दिवसांपूर्वी ऐकले होते की चिची (गोविंदा) मामा येत आहेत. सुनीता मामी त्यांच्या सोबत नसल्यामुळे आमच्या टीमला असं वाटलं की मला परफॉर्म करण्यास काही हरकत नाही. मात्र, गेल्या काही घटनांमुळे आमच्या नात्यात कटुता आली आहे. गेल्या वर्षी मामीची (सुनिता) इच्छा होती की मी तिच्यासमोर परफॉर्म करू नये. त्यामुळे यावेळी मी स्वत: हा निर्णय घेतला."
तो पुढे म्हणाले, "माझ्या मामाशी माझे घनिष्ट नाते होते. मात्र, शत्रुत्वाने मला वाईट रितीने प्रभावित केले आहे. दोन लोक अस्वस्थ असल्यावर विनोद करणे कठीण असते. मामा माझ्या विनोदांना अपमानास्पद मानू शकतात. कॉमिडीसाठी सेटसह चांगल्या वातावरणाचीही गरज असते. माझ्या अभिनयाने घरात आग लागू शकते असे मी ठामपणे सांगू शकतो. जरी सपनाच्या ऐवजी कृष्णा म्हणून मी अभिनय केला असला तरी मी त्यांना एक ट्रीब्यूट देऊ शकतो. "
त्यासोबत तो असेही म्हणाला, की 'मामा माझ्या मुलाला पाहण्यासाठी रुग्णालयात आले नव्हते, त्यातील एक आयुष्य आणि मृत्यू यांच्यामध्ये लढत होता. त्याने माझ्या फोन कॉलला उत्तरही दिले नाही. ”याशिवाय कृष्णाने बर्याच गोष्टीही सांगितल्या ज्यात त्यांचे आणि गोविंदाचे नात्यात कटुता असल्याचे दिसून आले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)