(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्रपटाला मिळालेल्या निगेटिव्ह रिस्पॉन्समुळे भुल भूलैयाच्या दिग्दर्शकावर आलेली रुग्णालयात भरती होण्याची वेळ, काय घडलेलं?
एका चित्रपटाबाबत सांगताना बज्मी यांनी सांगितलं की, ज्यावेळी या चित्रपटाला सुरुवातील चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यावेळी ते डिप्रेशनमध्ये गेले होते. ते एवढे दुखावले गेले होते की, त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
Bhool Bhulaiya 3: 'भूल भुलैया 3' दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी 'एंट्री', 'वेलकम' आणि 'सिंग इज किंग'सह अनेक कॉमेडी चित्रपट बनवले आहेत. हे तिन्ही चित्रपट बॉलिवूडचे धमाकेदार चित्रपट ठरले. सध्या बज्मींचा 'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक बज्मी म्हणालेले की, जरी हे चित्रपट उत्तम आणि ब्लॉकबस्टर ठरले, तरीसुद्धा यापैकी काही चित्रपटांना सुरुवातीला फारसा रिस्पॉन्स मिळाला नव्हता. अशाच एका चित्रपटाबाबत सांगताना बज्मी यांनी सांगितलं की, ज्यावेळी या चित्रपटाला सुरुवातील चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही, त्यावेळी ते डिप्रेशनमध्ये गेले होते. ते एवढे दुखावले गेले होते की, त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.
दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बोलताना याचा खुलासा केला आहे. त्यांच्या कामाबद्दलच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियांबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्यांच्या अनेक लोकप्रिय चित्रपटांची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. ते म्हणाले की, "मी बनवलेले काही चित्रपट लोकांना दाखवले. आणि लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, "अरे देवा, हा एक भयानक चित्रपट आहे."
'वेलकम'च्या नकारात्मक प्रतिसादानं अनीस बज्मी नाराज
अनीस बज्मी यांनी अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, कतरिना कैफ, परेश रावल, फिरोज खान आणि मल्लिका शेरावत अभिनीत 2007 च्या कॉमेडी 'वेलकम'चे उदाहरण दिलं. अनीस म्हणतात की, "जेव्हा मी 'वेलकम' बनवला तेव्हा लोकांची एकच तक्रार होती, ती कॉमेडी नाही. मी त्यांना सांगितले की, हे मी तयार केलं आहे आणि आता मी थिएटरमध्ये जाऊन लोकांना गुदगुल्या करू शकत नाही."
'वेलकम'च्या ट्रायल रनमध्ये कोणीही हसलं नव्हतं
अनीस बज्मी पुढे म्हणाले की, "ही एकमेव कॉमेडी आहे, जी कशी बनवायची हे मला माहीत आहे. मी तमाशा, डबल मिनिंग आणि इतर सर्वकाही जोडू शकत नाही. हे शॉर्टकट आहेत आणि माझा त्यांच्यावर विश्वास नाही. माझा विनोदी लेखनावर विश्वास आहे. 'वेलकम'च्या संपूर्ण ट्रायल रनमध्ये थिएटरमधील एकही व्यक्ती हसली नव्हती. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा लोकांनी त्याला कल्ट म्हटलं होतं."
'वेलकम' कल्ट सिनेमा आहे, अनीस बज्मींचं स्पष्ट मत
अनीस बज्मी पुढे बोलताना म्हणाले की, "आज रिलीज होऊन 16-17 वर्षांनंतरही लोक याला रिलेव्हंट म्हणतात आणि त्यावर मीम्स बनवतात. त्यामुळे आपण काहीतरी बरोबर केलंच असेल." अनीस यांनी कबूल केलं की, हे सर्व घडत असताना ते काही काळ गोंधळले होते. ते म्हणाले की, "एखादी व्यक्ती गोंधळून जाऊ शकते आणि त्यानं काहीतरी चुकीचं केलं आहे की, नाही याबद्दल विचार करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. कारण आपल्या समाजात लोक असंही म्हणतात की, जर सर्व जग काही बोलत असेल, तर ते सत्य म्हणून स्वीकारा. माझा त्यावर विश्वास आहे आणि मी प्रतिक्रिया देण्यास तयार आहे."