एक्स्प्लोर

1 तास 35 मिनिटांची फिल्म, प्रत्येक सीननंतर थ्रिलचा डोस... 2022 चा 'हा' चित्रपट पाहून पुरते हादरुन जाल

तुम्हीही सस्पेन्स, थ्रीलर चित्रपटांचे चाहते असाल, तर तुम्ही हा चित्रपट चुकवूच नये. ज्या प्रेक्षकांना थ्रिलर चित्रपट आवडतात, त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. OTT वरील सर्वोत्कृष्ट थ्रिलर चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाबाबत सविस्तर जाणून घेऊयात...

Bollywood Movies: जर तुम्ही ओटीटीवर (OTT) चित्रपट (Movies) पाहण्याची आवड असेल, तर आज आम्ही तुम्हाला एका खास चित्रपटाबाबत सांगणार आहोत. डॅमियन पॉवर (Damien Power) दिग्दर्शित आणि अँड्र्यू बॅरर आणि गॅब्रिएल फेरारी यांनी लिहिलेला हा अमेरिकन थ्रिलर चित्रपट आहे. 2017 मध्ये याच नावाची कादंबरी आली. या आधारावर निर्मात्यांनी 'नो एक्झिट' चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. चित्रपटातील सेलिब्रिटींबाबत बोलायचं झालं तर, हनाना रोज लिऊ, डॅनी रामिरेझ, डेव्हिड, डेल डिकी आणि डेनिस हेसबर्ट सारखे कलाकार आहेत.

25 फेब्रुवारी 2022 रोजी 'नो एग्जिट' (No Exit) रिलीज झाली होती. एक तास 35 मिनिटांच्या या चित्रपटाच्या सुरुवातीपासून तुम्हाला थ्रिलर आणि सस्पेन्सचा डोस मिळण्यास सुरुवात होते. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर ओटीटी प्लॅटफॉर्म Hulu वर पाहू शकता.                                   

'नो एक्झिट'ची कथा डार्बी थॉर्न (हवाना रोज लिऊ) भोवती फिरते. ती अंमली पदार्थांच्या व्यसनातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. मग एक दिवस तिला फोन येतो की, तिची आई हॉस्पिटलमध्ये दाखल आहे आणि तिच्यावर इमर्जन्सी सर्जरी झाली आहे. अनेकजण तिला रिहॅबमधून जाण्यास मनाई करतात. तिचं व्यसन आणि इतर समस्यांमुळे तिथे न जाण्याचा इशाराही ते देतात. पण ती तिथून पळून जाते. सगळीकडे बर्फवृष्टी झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झालेली असते. ती एवढ्या अडचणीत येते की, पुढे काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडतो. आता काय होणार? या विचारानंच तुमची धडधड वाढते. मग तिला एक मुलगी भेटते, जी खूपच संकटात आहे. असं दिसतं की, ती अडकली आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. आता ती या संकटांमधून ती बाहेर पडू शकेल का, हेच तुम्हाला दीड तासाच्या चित्रपटात पाहायला मिळेल. 

चित्रपटात खलनायकांच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनीही चमकदार कामगिरी केली आहे. तरी सर्वात मोठी जबाबदारी डार्बी म्हणजे, हवानाच्या खांद्यावर होती. हवाना ही अमेरिकन अभिनेत्री, नृत्यांगना आणि डिझायनर आहे. जिनं या चित्रपटांत चांगलं काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जेव्हा, बॉलिवूडच्या खिलाडी कुमारनं अंडरटेकरला उचलण्याच्या नादात कंबरडच मोडून घेतलेलं; अक्षय कुमारसोबत नेमकं काय घडलेलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Smita Thorat On Rohit Patil  : रोहित पाटलांच्या प्रचारात बहीण स्मिता थोरातही सहभागीABP Majha  Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 11 NOV 2024Amit Shah : सांगलीतल्या सभेत अमित शाहांचं सूचक वक्तव्य, 2 दिवसांत शाहांना सूर का बदलावे लागले?Shivani Vijay Wadettiwar  : वीज गेल्यामुळे काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवारांची भर सभेत शिवीगाळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Mumbai Crime: गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह; 7 तुकडे, डोकं, हात-पाय  प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये भरले
गोराईच्या जंगलात सापडला गोणीत भरलेला मृतदेह, प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये 7 अवयव
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
लोकसभेत ताईला, साहेबांना खुश केलं, आता मला मला खुश करण्यासाठी मतदान करा, अजित दादांची बारामतीकरांना भावनिक साद!
Amit Shah: आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
आधी अमित शाहांकडून देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत, नंतर अचानक सूर बदलला, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतचं वक्तव्य भोवलं, गुन्हा दाखल, निवडणूक आयोग ॲक्शन मोडमध्ये
धनंजय महाडिकांना लाडकी बहीण योजनेबाबतची टिप्पणी भोवली, निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget