एक्स्प्लोर
रणबीर आणि कतरीनाच्या पुन्हा भेटी-गाठी?
मुंबई: बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या ब्रेकअपची माहिती सर्वांनाच आहे. 2016 च्या सुरुवातीलाच या दोघांनी वेगळे होण्याचे ठरवले.
रणबीर-कतरीना हे दोघेही जेव्हा 'बार बार देखो' या चित्रपटाच्या निमित्ताने एका सेटवर एकत्रित आले, तेव्हा या दोघांनी भेट टाळली. पण आता जे घडले ते ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
डेक्कन क्रोनिकलच्या अहवालानुसार ''रणबीरला कतरीनाच्या नव्या घरी पाहाणे, त्याच्या जवळच्या मित्रांनाही अनपेक्षित होते. त्यामुळे हे सर्वच रणबीरला तेथे पाहून आश्चर्यचकित झाले. पण कतरीनाला रणबीरचे तिथे उपस्थित असणे जराही खटकले नाही. उलट रणबीरची तिथे उपस्थिती कतरीनाला अपेक्षितच असल्याचे जाणवत होते.''
रणबीरच्या आगमनानंतर तिथे काय झाले? हे सांगणे अवघड आहे. पण या घटनेनंतर त्या दोघांचे पॅचअप झाले आहे का? की त्यांच्यातील संबंध पूर्ववत झाले, की दोघेही झाले गेले विसरून मैत्रीचे नाते सुरु करण्याच्या तयारीत आहेत? या चर्चांना उधाण आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement