एक्स्प्लोर
विवेक ओबेरॉयकडून ललिता बन्सीला खास गिफ्ट

मुंबई : अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेली ललिता बन्सी अनेकांसाठी आशेचा किरण ठरली होती. पाच वर्षांपूर्वी आयुष्यात आलेल्या वादळानंतर ललिता सावरली. आता राहुल कुमार नावाच्या तरुणाने ललिताशी विवाह करुन, तिच्या आयुष्याला सुखद कलाटणी दिली आहे. ललिता आणि राहुलने ठाणे कोर्टात लग्न केलं. त्यानंतर मुंबईत झालेल्या रिसेप्शनमध्ये अॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणींसह अभिनेता विवेक ओबेरॉय, आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. विवेकने ललिताला ठाण्यात एक घर भेट म्हणून दिलं. इतकंच नाही तर भविष्यात होणाऱ्या शस्त्रक्रियांचा खर्च करण्याचं आश्वासनही दिलं. यानंतर विवेकने या नवविवाहित दाम्पत्यासोबतचा फोटो ट्विटर हॅण्डलवर शेअर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. https://twitter.com/vivek_oberoi/status/867058586479845376 https://twitter.com/vivek_oberoi/status/867054590444748800 ललिता आणि राहुलच्या लग्नासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता विवेक ऑबेरॉय आणि आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक उद्योजकांनी ललिताला मदत केली. तर फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी ललिताचे लग्नातील कपडे तयार केले आणि हारही भेट दिला. ललिता मूळची उत्तरप्रदेशातील आझमगडची आहे. 2012 मध्ये ललिताच्या चुलत भावाने कौटुंबिक कारणातून तित्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ललितावर 17 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. आणखी 12 शस्त्रक्रिया तिच्यावर होणार आहे. या घटनेनंतर ललिता आझमगडहून ठाण्यातील कळवामध्ये राहू लागली. राँग नंबरमुळे ललिता आणि राहुलमधील प्रेमकहाणी सुरु झाली. दोन महिन्यांनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संबंधित बातमी भंगलेल्या स्वप्नात पुन्हा रंग, अॅसिड हल्ला पीडितेचा विवाह पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























