एक्स्प्लोर

The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर'ची रिलीज डेट जाहीर! सत्य घटनेवर आधारित असणार सिनेमा

The Vaccine War : विवेक अग्निहोत्रींच्या (Vivek Agnihotri) आगामी 'द वॅक्सीन वॉर' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

Vivek Agnihotri The Vaccine War Release Date Out : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) 'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आज स्वातंत्र्यदिनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

'द वॅक्सीन वॉर' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (The Vaccine War Release Date)

'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्रींनी या सिनेमाची झलक सोशल मीडियावर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,"रिलीज डेटची घोषणा... प्रिय मित्रांनो, 'द वॅक्सीन वॉर' सत्यकथा हा सिनेमा जगभरात 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणा आहे". विवेक अग्निहोत्रींच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं आणि सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं सांगत आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. राजकारणावर आधारित थरार नाट्य प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. भ्रष्ट औषधांच्या कंपनीविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), राइमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर (Anupam Kher) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कलाकृतींची निर्मिती केली आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित 'द वॅक्सीन वॉर' चा टीझर आऊट केला आहे. टीझर आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा कोरोनाकाळावर भाष्य करणारा असणार आहे.

'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा आधी 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 'द वॅक्सीन वॉर' हा सिनेमा हिंदीसह इंग्रजी, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

The Vaccine War : 'द वॅक्सीन वॉर'मध्ये झळकणार नाना पाटेकर; विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट शेअर करत दिली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget