Nitin Gadkari : विमानतळाच्या कामात दिरंगाई; गडकरी म्हणतात, सॉरी नागपूरकर... Special Report
Nitin Gadkari : विमानतळाच्या कामात दिरंगाई; गडकरी म्हणतात, सॉरी नागपूरकर... Special Report
देशातले रस्ते आणि महामार्गांचं जाळं विस्तारण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं योगदानं मोठं आहे. पण याच गडकरींनी एका कामात होत असलेल्या दिरंगाईबाबत नागपूरकरांची चक्क माफी मागितली. नेमकं काय घडलं? पाहूयात...
वाहनांचा वेग वाढवणार असल्याची स्वप्न दाखवणारे
नवे रस्ते मार्ग सुरु करण्याच्या घोषणा करणाऱ्या
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी
आज मात्र जनतेची माफी मागितलीये.
आणि त्याला कारण आहे
नागपूर विमानतळाच्या रनवेचं रिकार्पेंटिंग
गेल्या दीड वर्षांपासून हे काम रखडलंय
त्यामुळेच गडकरींनी नागपूरकरांची माफी मागितलीये.
गडकरींनी नागपूर विमानतळाला भेट देत
रनवेच्या रिकार्पेटिंगच्या कामाचा आढावा घेतला
आणि अधिकाऱ्यांची शाळा घेतली
एवढंच नाही तर महिनाभरात काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्यात