Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची बॉलिवूडवर टीका! ट्विट करत म्हणाले ‘बॉलिवूड म्हणजे...’
Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडला प्रतिभेचे कब्रस्तान म्हटले आहे. नुकतेच विवेक अग्निहोत्रीनेही सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर मोठे वक्तव्य केले आहे.
Vivek Agnihotri : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. 'द कश्मीर फाइल्स'सारखा (The Kashmir Files) ज्वलंत विषयावर चित्रपट बनवणारे विवेक अग्निहोत्री प्रत्येक मुद्द्यावर आपले मत बेधडकपणे मांडतात. दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आपल्या एका वक्तव्यात 'द काश्मीर फाइल्स' भारत ऑस्करसाठी पाठवणार नाही, अशी चिंता व्यक्त केली होती. त्यावर आता विवेक अग्निहोत्री संतापले आहेत. त्यांनी अनुराग कश्यपचे नाव न घेता बॉलिवूडवर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमधून विवेक यांनी बॉलिवूडचे काळे सत्य जगासमोर उघड केले आहे. विवेकच्या मते, बॉलिवूड हे सामान्य माणसाला समजून घेण्याची जागा नाही. इतकेच नाही, तर विवेक अग्निहोत्री यांनी बॉलिवूडला प्रतिभेचे कब्रस्तान म्हटले आहे. नुकतेच विवेक अग्निहोत्रीनेही सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर मोठे वक्तव्य केले आहे. आता त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, बॉलिवूड जसे दिसते, तसे नाहीय. येथे स्वप्ने चिरडली जातात.
पाहा पोस्ट :
विवेक अग्निहोत्रीही बॉलिवूडवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहे. विवेक यांनी नुकतीच अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘बॉलिवूडची गोष्ट, नक्की वाचा’, असे लिहिले आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलेय की, मी आता बॉलिवूडमध्ये इतका वेळ घालवला आहे की, आता मला समजते ही इंडस्ट्री कशी चालते. तुम्ही पाहता ते बॉलिवूड नाही. वास्तविक बॉलिवूड अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये आहे, जे पाहणे सामान्य माणसासाठी सोपे नाही. या अंधारलेल्या गल्ल्यांमध्ये तुम्हाला अनेक तुटलेली आणि गाडलेली स्वप्ने पाहायला मिळतील. बॉलिवूड हे कथांचे संग्रहालय असेल, तर ते प्रतिभेचे कब्रस्तानही आहे, हे नाकारू शकत नाही. इथे अपमान आणि शोषण होते, ज्यामुळे प्रत्येकाची स्वप्ने भंग पावतात. मनुष्य अन्नाशिवाय जगू शकतो, परंतु आदर आणि आशेशिवाय जगणे अशक्य आहे.
.. ते लोक नशेच्या आहारी जातात!
‘मात्र, जेव्हा कुणी लढण्याऐवजी हार मानतात, तेव्हा खूप वाईट वाटते. ज्यांना वेळीच घरी परतता येते, ते खरे भाग्यवान. ज्या लोकांना थोडेफार यश मिळते, ते ड्रग्ज, दारू आणि जीवन उध्वस्त करणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये गुंततात. थोडेसे यश ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. तुम्ही कोणत्याही कमाई आणि पॉवरशिवाय शोबिझमध्ये असता. तुम्हाला स्टारसारखे दिसावे लागेल, स्टारसारखी पार्टी करावी लागेल, स्टारसारखा पीआर करावा लागतो, पण तुम्ही स्टार नसता’, असे म्हणत त्यांनी बॉलिवूडची पडद्यामागची गोष्ट समोर आणली आहे.
संबंधित बातम्या