एक्स्प्लोर
VIDEO : चीनमध्ये 'दंगल'चा बोलबाला, 'धाकड' गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई : सध्या चीन आणि भारताचे संबंध ताणले गेले असले तरी, चीनच्या नागरिकांचं भारत प्रेम पुन्हा उघड झालं आहे. कारण चीनमध्ये सध्या आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाची चांगलीच चलती आहे. विशेष म्हणजे, चीनच्या नागरिकांनी आमीरला सिनेमातील 'धाकड' गाण्याच्या माध्यमातून रिटर्न गिफ्ट दिलं आहे.
आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने चीनमध्येही चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चीनमधील कमाईची आकडेवारी जोडल्यास हा आकडा 1800 कोटींपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे, कमाईचा हा आकडा अजूनही वाढतोच आहे.
वास्तविक, चीनमध्ये आमीरच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी 'दंगल' सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला आहे. सिनेमातील 'धाकड' गाण्याच्या माध्यमातून आमीरच्या चाहत्यांनी त्याला एका व्हिडीओच्या माध्यमातून खास रिटर्न गिफ्ट दिलं आहे. या व्हिडीओत चीनच्या चेंगदु प्रांतातील आमीरच्या चाहत्यांनी 'दंगल' सिनेमातील 'धाकड' गाण्यावर डान्स केला आहे.
दरम्यान, आमीरच्या 'दंगल'ने बंपर कमाईद्वारे चीनमध्ये प्रदर्शित होणारा नॉन हॉलीवूड सिनेमा ठरला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांनीही या सिनेमातील आमीरच्या अभिनयाचे कौतुक केलं होतं.
चिनी नागरिकांनी दंगल सिनेमातील धाकड गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओ पाहा
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
ठाणे
भारत
Advertisement
Advertisement


















