एक्स्प्लोर

Vikram Vedha : 'विक्रम वेधा'चे शूटिंग पूर्ण, हृतिक रोशनने शेअर केला सैफ अली खानसोबतचा खास फोटो!

Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आगामी चित्रपट 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) आगामी चित्रपट 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. आर माधवन (R Madhavan) आणि विजय सेतुपती (Vijay xsethupathi) यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याच वेळी, आता हा चित्रपट 30 सप्टेंबर 2021 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. याबाबत माहिती देताना अभिनेता हृतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

'विक्रम वेधा'च्या सेटवरील फोटो शेअर करत हृतिक रोशनने लिहिले की, 'शूटिंग पूर्ण होताच या सेटशी निगडित सर्व आनंदी आठवणी माझ्या मनात ताज्या झाल्या आहेत. कृती, साहस आणि कठोर परिश्रम.... 'विक्रम वेधा' तुमच्यासाठी खास बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उत्साही असण्याबरोबरच, आज मी थोडा काळजीतही आहे.. जसजशी रिलीजची तारीख जवळ येईल, तसतशी चिंताही वाढेल.’ या चित्रपटाद्वारे हृतिक तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर अॅक्शन-पॅक अवतारात परतणार आहे.

पाहा पोस्ट :

ऑक्टोबर 2021 मध्ये सुरू झालेल्या या चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे. याची माहितीही हृतिकने ट्विटवर शेअर केली आहे. अबू धाबीपासून लखनऊ आणि मुंबईपर्यंत अनेक शहरांमध्ये चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. शूटिंग संपल्यानंतर, चित्रपट आता त्याच्या पोस्ट-प्रॉडक्शन टप्प्यात आहे आणि या वर्षाच्या येत्या काही महिन्यांतच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

हृतिक रोशन, सैफ अली खानचे पात्र कसे असेल?

'विक्रम वेधा' या चित्रपटात हृतिक रोशन 'वेधा'च्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच निर्मात्यांनी हृतिक रोशनचा फर्स्ट लूक रिलीज केला होता. पहिल्या लूकमध्ये दाढी-मिशी, डोळ्यांवर चष्मा, कुर्ता, गळ्यात काळा दोरा, विखुरलेले केस, चेहऱ्यावर रक्ताचे डाग यात हृतिक एकदम खलनायक दिसत होता. या चित्रपटात हृतिक रोशन ‘वेधा’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर, सैफ अली खान (Saif Ali Khan) या चित्रपटात 'विक्रम'ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

काय आहे कथानक?

'विक्रम आणि वेताळ' या भारतीय लोककथेवर आधारित, 'विक्रम वेधा' हा एक उत्कृष्ट अॅक्शन क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, एका कठोर पोलीस अधिकाऱ्याच्या कथेभोवती फिरतो. जो एक खतरनाक गुंड शोधण्यासाठी आणि त्याला पकडण्यासाठी निघतो. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि सैफ अली खान दोन सुपरस्टार एकत्र काम करत आहेत.

हेही वाचा :

Hrithik Roshan : ह्रतिकचा 'विक्रम वेधा' मधील लूक; फोटो पाहून सबा म्हणाली..

Vikram Vedha : सैफ अली खानचा 'विक्रम वेधा' मधील लूक रिलीज ; करिना म्हणाली...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget