Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली; चैन्नईतील रुग्णालयात दाखल
Vikram Health Condition : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमला चैन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Ponniyin Selvan Vikram Hospitalized : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विक्रमची (Vikram) प्रकृती खालावली आहे. त्याला चैन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विक्रमची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विक्रमची प्रकृती खालावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शुक्रवारी विक्रमची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विक्रमला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. विक्रम बरा व्हावा यासाठी चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. विक्रम हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे.
विक्रमचा 'पोन्नियिन सेल्वन' लवकरच होणार रिलीज
विक्रमची प्रकृती खालावल्याने सध्या तो चर्चेत आहे. विक्रमचा आगामी 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक मणिरणत्नम यांनी सांभाळली आहे. नुकताच 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमातील विक्रमचा लूक रिलीज झाला आहे. या सिनेमात विक्रमसोबत बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 30 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पोन्नियिन सेल्वन' दोन भागांत होणार प्रदर्शित
'पोन्नियिन सेल्वन' हा सिनेमा दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा कल्कि यांच्या एका तामिळ कादंबरीवर आधारित आहे. 1995 साली कल्कि यांनी ही कादंबरी लिहिली आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या