एक्स्प्लोर

Vikram Box Office Collection : कमल हासनच्या ‘विक्रम’चा नवा महाविक्रम! प्रभासच्या ‘बाहुबली’लाही टाकले मागे..

Vikram : दोन आठवड्यानंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

Vikram : अभिनेते कमल हासन (Kamal Haasan) यांचा 'विक्रम' (Vikram) हा चित्रपट दिवसेंदिवस नवनवे रेकॉर्ड मोडत आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. दोन आठवड्यानंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. या चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 150 कोटींची कमाई केली आहे. हा या चित्रपटाचा एक नवा विक्रम आहे. ‘विक्रम’ चित्रपटाच्या आधी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' ने हा पराक्रम केला होता. मूलतः तेलुगूमध्ये बनलेल्या 'बाहुबली 2' ने राज्यात 146 कोटींची कमाई केली होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की, 'विक्रम' हा राज्यातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'विश्वसम' आणि 'बाहुबली 2'ला मागे टाकून 'विक्रम' लवकरच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाईचा आकडा पार करून पहिल्या क्रमांकावर पोहोचणार आहे.

‘या’ चित्रपटांनाही टाकले मागे!

'विक्रम' याआधीच तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने 'बीस्ट' चित्रपटाच्या 119 कोटींच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. त्याचवेळी 'केजीएफ चॅप्टर 2' या कन्नड चित्रपटाने तामिळनाडूमध्ये 100 कोटींचा व्यवसाय केला आहे.

'विक्रम'ने जगभरातील कमाईमध्ये 350 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील तमिळ चित्रपटाच्या सर्वाधिक कलेक्शनच्या बाबतीत 'विक्रम' आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. ‘थलायवा’ रजनीकांत यांचा ‘2.0’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 655 कोटींची कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई!

रिपोर्ट्सनुसार, 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 11 दिवसांत भारतातील सर्व भारतीय भाषांमध्ये 220.75 कोटींची कमाई केली आहे. त्याच वेळी, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 350 कोटी रुपयांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट जगभरात 3200 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. ‘विक्रम’ हा लोकेश कनागराज दिग्दर्शित अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात विजय सेतुपती, फहाद फासिल, कमल हासन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेता सुर्याचा या चित्रपटात एक कॅमिओ देखील आहे, यात तो ‘रोलेक्स’ची भूमिका करताना दिसला होता.

हेही वाचा :

Vikram : पुष्पा नंतर आता विक्रमची क्रेझ; क्रिकेटर वॉशिंग्टन सुंदरकडून भन्नाट व्हिडीओ शेअर

Vikram box office day 10 collection : जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रम'ची जादू

Vikram : विक्रमच्या यशानंतर सूर्याला कमल हसन यांनी दिलं 'रोलेक्स' घड्याळ; किंमत ऐकून व्हाल थक्क!

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
Pune Ketal Agarwal Murder Case Director Sanjay Gupta Reaction: 'सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका...'; केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं, नेटकऱ्यांनी झोडून काढलं
'सियासोबत रिया चक्रवर्तीसारखं वागू नका...'; केतन अग्रवाल प्रकरणावर बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकानं उधळली मुक्ताफळं, नेटकऱ्यांनी झोडून काढलं
Munnabhai MBBS Fame Yatin Karyekar: 'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...
'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Case :
"तो खूप साधा, मनमिळाऊ होता, केतनच्या स्वप्नातील लग्नासाठी..." केतन अग्रवालच्या मृत्यूनंतर वेडिंग प्लॅनरही हळहळले; सोशल मीडियावर फोटो शेअर करत वाहिली श्रद्धांजली
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
वैभव सूर्यवंशीची प्रतीक्षा अवघ्या काही दिवसांची, पण तो गेल्या पाच वर्षांपासून वाट पाहतोय! आतापर्यंत अनेकदा संघात निवड झाल्याचा आनंद, पण प्लेईंग इलेव्हनमध्ये नाव कधीच आलंच नाही
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
उद्धवसाहेब तुमचं ठीक आहे, पण आदित्य ठाकरेंना फिरवा महाराष्ट्रात; बंडू जाधव पहिल्यांदाच बोलले, पक्ष सोडण्याचं कारणही सांगितलं
Prashant Kishor: बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
बिहार निवडणुकीत पक्षाची दैना होताच अखेर प्रशांत किशोर निवडणुकीच्या मैदानात! थेट मोदींच्या बाॅसच्या जागेवर शड्डू ठोकला! भाजपने सुद्धा पत्ता खोलला
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
धक्कादायक! मित्राच्या 1.5 लाख रुपयांसाठी जामीन राहिला; खासगी सावकाराने सव्वा कोटीची जमीन घेतली, अजूनही 70 लाखांची मागणी
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
शाळा परिसरात 'स्टिंग' बंदीचे आदेश, तुकाराम मुंढे कारवाई करतील का? मंत्र्यांचे निर्देश, भाजप आमदाराचा सवाल
Nagpur Crime News : एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
एसटी महामंडळाची ई-बस चोरली; चार्जिंग संपली अन्...गेम झाला, एका चीपमुळं सापडलं 20 गुन्हे असलेल्या तेलंगणाच्या चोराच लोकेशन
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
इंग्लंड महिलांची T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक; विजेतेपदासाठी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाशी भिडणार, दक्षिण आफ्रिका पुन्हा कमनशिबी ठरली!
Embed widget