Subodh Bhave: सरकारी कार्यक्रमात मराठी कलाकारांना पाठीमागे उभं केलं जातं, हिंदी कलाकारांना डोक्यावर घेतात, ते पाहून प्रचंड राग येतो; सुबोध भावे स्पष्टच बोलले
Subodh Bhave on Actors: सुबोध भावेंनी व्यक्त केला संताप, म्हणाले, हिंदी कलाकारांना मानाचं स्थान, मराठी कलाकारांना मात्र मागे उभं करतात.

Subodh bhave on Hindi And Marathi Actors: मराठी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ मराठीच नाही तर, हिंदी सिनेसृ्ष्टीतही (Bollywood) उल्लेखनीय कामगिरी केली. सुबोध भावे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. विविध मुद्द्यांवर आपलं मत मांडतात. अलिकडेच त्यांनी बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी एक खंत आणि एक संताप व्यक्त करुन दाखवला. 'प्रत्येकाचा आपआपला एक सन्मान असतो, तो सन्मान द्यायला हवा', असं सुबोध भावे म्हणाले.
हिंदी अन् मराठी कलाकारांविषयी सुबोध भावे नेमकं काय म्हणाले? (Subodh Bhave Opens Up About Unequal Treatment)
View this post on Instagram
अलिकडेच सुबोध भावे यांनी Mehak Ankar यांच्या पॉडकास्टला भेट दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से शेअर केले. त्यांनी हिंदी आणि मराठी कलाकारांना मिळत असलेली वागणूक यावर भाष्य केलं आहे. सुबोध भावे म्हणाले की, 'जर कोणता कलाकार महाराष्ट्रातील किंवा इतर कार्यक्रमात येतो. त्याच्यासोबत एक मराठी अभिनेताही असतो, ज्याने आपल्या आयुष्यातील 40 वर्षे या सिनेइंडस्ट्रीसाठी वाहिली आहे. तो कमालीचा अभिनेता आहे'.
'पण दुसऱ्या कलाकाराने केवळ हिंदी सिनेमांमध्ये काम केलं म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही डोक्यावर घेता. त्याचवेळी मराठी कलाकार मागे गर्दीत स्वत:ला शोधत असतो. तो जबरदस्त अॅक्टर आहे. ज्येष्ठ कलाकार आहे. पण त्याने हिंदी सिनेमांमध्ये काम केलं नाही म्हणून... अशी स्थिती पाहिली तर प्रचंड राग येतो. प्रत्येकाचा आपआपला सन्मान असतो. आपण तो आदर द्यायला हवा. सन्मान करायला हवा. जिथे यथोचित सन्मान दिला जात नाही, तिथे मग प्रचंड राग येतो', असं सुबोध भावे म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















