Chhaava First Day Collection : विकी कौशलचा छावा चित्रपट पहिल्याच दिवशी पाडणार पैशांचा पाऊस? प्रदर्शनानंतर किती रुपये कमवणार?
Chhaava : विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी किती रुपये कमवणार? याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

Chhaava Box Office Day 1 Prediction: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे समस्त महाराष्ट्रात त्याची विशेष चर्चा होत आहे. देशातील इतर राज्यांतही या चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, लोकांचा प्रतिसाद पाहता हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भरभक्कम गल्ला जमवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
छावा चित्रपटाची सगळीकडे चर्चा
या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी सर्व कलाकार चित्रपटाचा जोमात प्रचार करत आहेत. रश्मिका मंदानाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ती सध्या या चित्रपटाच्या प्रचारासाठी देशभर फिरत नाहीये. मात्र विकी कौशल मात्र देशातील प्रमुख शहरांत जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.
अॅडव्हान्स बुकिंगला अद्याप सुरुवात नाही
या चित्रपटाला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर काही आक्षेप घेण्यात आले होते. मात्र आक्षेपार्ह दृश्य वगळ्याचे आश्वासन दिल्यानंतर हा वाद मागे पडला. हा चित्रपट सिनेमागृहात पाहण्यासाठी तिकिटांच्या अॅडव्हान्स बुकिंगला अद्याप सुरुवात झालेली नाही. मात्र हा चित्रपट पहिल्या दिवशी किती रुपये कमवणार, याबाबत काही ठोकताळे बांधळे जात आहेत.
छावा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करणार?
पिकंविलाच्या अंदाजानुसार हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी साधारण 17-19 कोटी रुपये कमाई करू शकतो. असे झाल्यास आगामी काळात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे. सोबतच हा चित्रपट पहिल्या दिवशी 19 कोटी रुपये कमवू शकला, तर विकी कौशलच्या करिअरमधील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरू शकतो.
View this post on Instagram
विकी कौशलच्या अन्य चित्रपटांनी पहिल्या दिवशी किती कमाई केली होती?
याआधी विकी कौशलच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे. त्याच्या बॅड न्यूज या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 8.62 कोटी रुपये कमवले होते. उरी : दर्सिजकल स्ट्राईक या चित्रपटाने पहिल्या दिवशी 8.20 कोटी रुपये कमवले होते. तिसऱ्या क्रमांकावर राजी या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.53 कोटी रुपयांची कमाई केली होती. सॅम बहादूर या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 5.75 कोटी रुपये कमवले होते.
हेही वाचा :
धक्कादायक! वीर पहारियावर विनोद केला म्हणून कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण
























