'मी परफेक्ट Husband नाही, पण...'; विकीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष
आता एका मुलाखतीमध्ये विकीनं (Vicky Kaushal) वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. 'मीपरफेक्ट हसबंड नाही' असं या मुलाखतीमध्ये विकी म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
Vicky Kaushal: अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा विवाह 9 डिसेंबर 2021 रोजी पार पडला. राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur) मधील बरवाडा फोर्टमध्ये कतरिना आणि विकीचा लग्न सोहळा पार पडला. कतरिना आणि विकी हे एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आता एका मुलाखतीमध्ये विकीनं वैवाहिक जीवनाबद्दल सांगितलं आहे. 'मी परफेक्ट हसबंड नाही', असं या मुलाखतीमध्ये विकी म्हणाला. त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले.
काय म्हणाला विकी?
एका मुलाखतीमध्ये विकीनं सांगितलं, 'लग्नाआधी एकटं राहणाऱ्यांच्या आयुष्यात लग्नानंतर बरेच बदल होतात. एखादी व्यक्ती तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहायला लागते, ज्यामुळे त्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते.'
पुढे विकीनं सांगितलं, 'लग्नानंतर माझ्या आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टी सकारात्मक होत आहेत. स्पष्टपणे सांगायचे तर, एक व्यक्ती म्हणूनलग्नानंतर तुमच्यात बदल होतो. समजा तुमच्याकडे एका रंगाचा सेट आहे आणि लग्नानंतर दुसरी व्यक्ती त्याच्या रंगाचा सेट घेऊन आली तर तुमच्याकडे दुप्पट रंग होतील, हे आश्चर्यकारक आहे.'
'मी एक परफेक्ट पती किंवा परफेक्ट मुलगा नाही. पण मी रोज परफेक्ट होण्याचा प्रयत्न करतो आणि खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतो.' असंही विकीनं सांगितलं.
विकी आणि कतरिना यांचा विवाह सोहळा पार पडल्यानंतर प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच दीपिका, मनीष मल्होत्रा, ऋतिक रोशन, जाह्नवी कपूर, श्वेता बच्चन, टाइगर श्रॉफ आणि परिणीती चोप्रा या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
कतरिना आणि विकीचे चित्रपट
काही दिवसांपूर्वी विकीचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. तर कतरिना ही काही महिन्यांपूर्वी फोन भूत या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. कतरिनाच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आता कतरिनाचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. कतरिनाचा टायगर-3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच विकी हा त्याच्या सॅम बहादूर या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या:
Vicky Kaushal : अनुराग कश्यपसाठी विकी कौशल झाला डीजे, सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज