Chhaava Trailer Out : जय भवानीचा नारा अन् अंगावर काटा आणणारा अभिनय, छावा चित्रपटाचा धगधगता ट्रेलर पाहाच!
Chhaava Film Trailer Out Now : छत्रपती संभाजीनगर यांच्या जीवनावर आधारलेल्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच रिलीज झाला आहे.
Chhaava Trailer Released : गेल्या अनेक दिवासांपासून चर्चेत असलेल्या छावा या चित्रपटाचा ट्रेलर अखेर आला आहे. नुकतेच या चित्रपटातील पात्रांचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारलेला हा चित्रपट आहे. एकूण तीन मिनिटांच्या हा ट्रेलर असून प्रेक्षकांनी विकी कौशलने (Vicky Kaushal) केलेल्या अभिनयाची प्रशंसा करत आहेत.
तीन मिनिटांचा थरारक ट्रेलर
मॅडॉक फिल्म्सच्या यूट्यूब चॅनेलवर नुकतेच छावा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर एकूण 3 मिनिटांचा आहे. पण या तीन मिनिटांत दाखवण्यात आलेले दृश्य, कथेचा दाखवण्यात आलेला सारांश तसेच विकी कौशलने केलेल्या अभिनयामुळे अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. हा ट्रेलर पाहून तशा काही प्रतिक्रिया आल्या आहे.
चित्रपटात दिग्गज अभिनेते
या चित्रपटात दिग्गज अभिनेते आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे पात्र विकी कौशलने साकारलेले आहे. तर महाराणी येसुबाई यांची भूमिका रश्मिका मंदानाने केली आहे. मुघल बादशाहा औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. काही दिवसांपूर्वी या तिन्ही पात्रांचे पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते. यात अक्षय खान्नाचा औरंगजेबातील वेश पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. अनेकांना तर हा अक्षय खन्ना आहे, हेदेखील समजले नाही.
Chhaava Film Trailer :
ट्रेलर दमदार, चित्रपट कसा असेल?
गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र जिवंत करण्यासाठी विकी कौशलने स्वत:वर खूप मेहनत घेतलेली आहे. तसेच औरंगजेबाच्या भूमिकेत जाण्यासाठी अक्षय खन्नानेही स्वत:वर चांगले काम केले आहे. या ट्रेलरमध्ये रश्मिका मंदानानेही महाराणी येसुबाईंच्या पात्राला न्याय दिल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे ट्रेलर दमदार असल्यामुळे आता चित्रपट कसा असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर मराठमोळा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापेक्षाही सर्वाधिक जमेची बाब म्हणजे या चित्रपटाला संगीत क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे ए. आऱ. रेहमान यांनी दिलं आहे.
हेही वाचा :
बिग बॉसमधील हिरोईनला मुंबईत घर मिळेना, घरमालकांच्या 'त्या' प्रश्नामुळे चांगलीच भडकली!
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न