एक्स्प्लोर

Ved: रितेश-जेनिलियाचा 'वेड' दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

वेड (Ved) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता.काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वेड हा मजिली (Majili) या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला आहे.   

Ved: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी लवकरच रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. पण काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वेड हा मजिली (Majili) या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला आहे.   

नेटकऱ्यांच्या पोस्ट

एका नेटकऱ्यानं वेड चित्रपटाबाबत ट्विटरवर ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं, 'वेड हा मजिली चित्रपटाचा रिमेक आहे. जेव्हा मी या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं तेव्हा मला वाटलं की हा फ्रेश चित्रपट आहे पण पाहा हा रिमेक आहे. जेनिलिया ही चांगली अभिनेत्री आहे. पण समंथाला कोणीही रिप्लेस करु शकत नाही.'

तर दुसऱ्या नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'वेड हा मजिरी या चित्रपटाचा रिमेक आहे? मी हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.'

मजिली हा दाक्षिणात्य चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

वेड या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश यांच्यासोबतच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री  जिया शंकर इत्यादी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Akshay Kumar: रितेश आणि जिनिलियाच्या 'वेड' चित्रपटासाठी अक्षय कुमारची खास पोस्ट; म्हणाला, 'माझा भाऊ...'

 

महत्त्वाच्या बातम्या

Music Composer Pritam Likely Get Retirement: अरिजित सिंहपाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध गायक बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? 'त्या' पोस्टनं चाहत्यांची चिंता वाढवली
अरिजित सिंहपाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध गायक बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? 'त्या' पोस्टनं चाहत्यांची चिंता वाढवली
Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case: '...त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही'; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?
'...त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही'; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?
Actress Sanchita Ugale Case: संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
संचिता उगले प्रकरणाचं सत्य बाहेर येणार? AICWAचं मोठं पाऊल, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, कारवाईला वेग
Pranit More 370 Biryani: 'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..
'जेव्हा कुणाचा तरी मृतदेह...'; '370 बिर्याणी' प्रकरणात मुनव्वर फारुकीची उडी, प्रणित मोरेच्या सपोर्टमध्ये म्हणाला..

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Opration Tiger Eknath Shinde-Uddhav Thackeray: ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, पण एकनाथ शिंदेंची सावध खेळी; एका निर्णयाने पुन्हा सगळे चक्रावले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Embed widget