Varun Dhawan: शूटिंगदरम्यान वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत; अभिनेत्यानं फोटो शेअर करत दिली माहिती
Varun Dhawan: नुकताच वरुणनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्या दुखापतीची माहिती चाहत्यांना दिली आहे.
Varun Dhawan Get Injured: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळते. वरुण हा सध्या त्याच्या 'VD 18' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण जखमी झाला.त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकताच वरुणनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे.
वरुण धवनच्या पायाला झाली दुखापत
वरुण धवनने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर असा एक फोटो शेअर केला आहे. वरुणनं इन्स्टाग्राम स्टोरीवर त्याच्या सुजलेल्या पायाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वरुण खुर्चीवर पाय ठेवलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चाहत्यांना माहिती दिली आहे की, शूटिंगदरम्यान त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. हा फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना वरुणने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुजलेला पाय, माझा पाय लोखंडी रॉडला आदळला होता."
View this post on Instagram
शूटिंगदरम्यान वरुणला दुखापत होण्याची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी सप्टेंबरमध्ये वरुणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एक व्हिडीओ शेअर केला होता आणि त्याच्या दुखापतीबद्दल सांगितले होते. व्हिडीओमध्ये तो वेदना कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्यात पाय ठेवताना दिसला.
वरुण हा सध्या तमिळ चित्रपट निर्माते कलिस दिग्दर्शित 'व्हीडी 18' या चित्रपटात व्यस्त आहे. या चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. मार्च 2024 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल, असंही म्हटलं जात आहे. 'VD 18' हा तमिळ चित्रपट 'थेरी'चा रिमेक आहे.
वरुणचा 'बावल' ओटीटीवर झाला रिलीज
वरुणचा बावल हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्यानं जान्हवी कपूरसोबत काम केलं होतं. हा चित्रपट 21 जुलै रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तसेच वरुण हा सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. यामध्ये तो समंथासोबत काम करणार आहे.
संबंधित बातम्या: