एक्स्प्लोर

Varisu Trailer:  अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; विजय अन् रश्मिकाच्या 'वरिसु' चा ट्रेलर रिलीज

ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

Varisu Trailer:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काल (4 जानेवारी) विजयच्या वरिसु (Varisu) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर (Varisu Trailer) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

वरिसु (Varisu Trailer) या चित्रपटात विजय आणि रश्मिका यांच्यासोबतच अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj), आर सरथकुमार, प्रभू, शाम, श्रीकांत, खुशबू, योगी बाबू, जयसुधा, संगीता क्रिश, संयुक्ता षण्मुघनाथन, नंदिनी राय, गणेश वेंकटरामन, श्रीमन, व्हीटी गणेशन, जॉन विजय, भरत रेड्डी, संजना या कलाकांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. वामशी पडाईपल्ली यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. राजू, शिरीष यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 

वरिसु (Varisu Trailer) या चित्रपटाच्या ट्रेलरला जवळपास दोन मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या ट्रेलरला कमेंट करुन विजयला त्याच्या या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर विजय हा दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या एका प्रोजेक्टवर काम करणार आहे. 

पाहा ट्रेलर: 

काही दिवसांपूर्वी विजयनं त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरुन वरिसु चित्रपटाचा पोस्टर शेअर केला होता. 

काही महिन्यांपूर्वी विजय हा बीस्ट या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आला. बीस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांनी केलं आहे. बीस्ट चित्रपटात सेल्वाराघवन, शाईन टॉम चाको, योगी बाबू, व्हीटीव्ही गणेश आणि रॅडिन किंग्सले या कलाकारांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली.  हा चित्रपट 13 एप्रिल रोजी रिलीज झाला होता.  विजय थलापतीनं रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं 200 कोटींची कमाई केली आहे. थलापती विजयच्या वडिलांना देखील हा चित्रपट फारसा आवडला नाही. विजय थलापतीचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट निर्माते आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Entertainment News Live Updates 5 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget