VIDEO: वायर,काचा आणि पिझ्झानंतर आता माशी; उर्फीच्या अतरंगी ड्रेसची सोशल मीडियावर चर्चा
Uorfi Javed: नुकताच उर्फीनं तिच्या खास लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी ही तिच्या विविध लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच उर्फीनं तिच्या खास लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीच्या या लूकची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
उर्फीचा अतरंगी लूक
उर्फीचा एक नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उर्फीनं तिच्या नव्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक माशी दिसत आहे. त्यानंतर व्हिडीओमध्ये उर्फी ही पांढरी पँट आणि जॅकेट अशा लूकमध्ये दिसत आहे. उर्फीच्या पँट आणि जॅकेटवर बऱ्याच खोट्या माश्या लावलेल्या दिसत आहेत. उर्फी जावेदने तिच्या या नव्या लूकचा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "हे चांगले आहे की, ससुराल सिमर का मालिकेमध्ये मी नव्हते, सिमर वाचली." उर्फीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
काहींनी केलं कौतुक तर काहींनी केलं ट्रोल
उर्फीच्या या नव्या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या व्हिडीओला कमेंट करुन तिला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "माश्या आता उर्फीला घाबरतील"
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
कधी पिझ्झा तर कधी वायरपासून तयार केलं आऊटफिट
उर्फीनं याआधी प्लास्टिक, वायर, पिझ्झा आणि काचांपासून तयार केलेला ड्रेस परिधान करुन सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. उर्फी ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते.
दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमधून उर्फी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. MTV Splitsvilla गेस्ट कंटेस्टेंट म्हणून देखील उर्फीनं सहभाग घेतला होता. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. पण सध्या उर्फी ही तिच्या अतरंगी लूकमुळेच चर्चेत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: