(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Unn Sawali Marathi Movie : "खूप वर्षानंतरही कळत नाही आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर कोण?"; 'ऊन सावली'चा टीझर आऊट, भूषण प्रधान, शिवानी सुर्वे मुख्य भूमिकेत
Unn Sawali Marathi Movie Teaser Out : 'ऊन सावली' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Unn Sawali Marathi Movie Teaser Out : 'ऊन सावली' (Unn Sawali) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा कमाल टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. 'ऊन सावली' या सिनेमात भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
'ऊन सावली'च्या टीझरमध्ये काय? (Unn Sawali Teaser Out)
'ऊन सावली' हा रोमँटिक सिनेमा असल्याचा अंदाज टीझरवरुन येत आहे. घर दाखव हा अरेंज मॅरेजमधला कोडवर्ड असतो ना.. पण खरचं एका भेटीत आपण एकमेकांना कसे ओळखणार आहोत, कधीकधी खूप वर्षांनंतरही कळत नाही की हाच आपल्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर आहे, असे खूप काही सांगून जाणारे सटल संवाद या सिनेमात आहेत.
View this post on Instagram
'ऊन सावली' या सिनेमात शिवानी सुर्वेसह (Shivani Surve) खऱ्या आयुष्यातील तिचा पती आणि अभिनेता अजिंक्य ननावरेदेखील (Ajinkya Nanaware) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात शिवानी आणि अजिंक्यचा ब्रेकअप झालेला दाखवण्यात आला आहे. त्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात भूषण प्रधानची (Bhushan Pradhan) एन्ट्री होते. आता जोडीदार म्हणून शिवानी भूषणचा स्वीकार करणार का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
'ऊन सावली' कधी होणार रिलीज? (Unn Sawali Release Date)
दिवाकर नाईक (Diwakar Naik) यांनी 'ऊन सावली' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'ऊन सावली' हा सिनेमा 15 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणा आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भूषण प्रधान, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'ऊन सावली' या सिनेमाची निर्मिती तिकीट विंडो पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात येणार आहे. समीर ए. शेख या सिनेमाचे निर्माते आहेत. दिवाकर नाईक आणि अभय वर्धन यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहेत. तर सिनेमातील गाणी वलय मुळगुंद, विश्वजीत रनाडे, आदित्य पवार आणि वैभव देशमुख यांची आहेत.
मराठी मनोरंजनसृष्टीत (Marathi Movies) विविध धाटणीचे, वेगवेगळ्या दर्जाचे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांना नेमकं काय पाहायला आवडतंय हे हळूहळू मराठी सिने-निर्मात्यांना कळू लागलं आहे. त्यामुळे साध्या सरळ विषयांपासून ते ऐतिहासिक, रोमँटिक, हॉरर, विनोदी असे वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमे प्रदर्शित होत आहेत.
संबंधित बातम्या