(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tunisha Sharma: तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; लेकीला अखेरचा निरोप देताना आईच्या अश्रूंचा फुटला बांध
Tunisha Sharma Last Rites: मीरा रोड येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या (Tunisha Sharma) पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Tunisha Sharma Last Rites: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.. तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी जगाचा निरोप घेतला. मीरा रोड येथील गोडदेव स्मशानभूमीमध्ये तुनिषाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेता विशाल जेठवा, अभिनेत्री रोशनी वालिया, अभिनेत्री स्वीटी वालिया तसेच काही सेलिब्रिटी तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.
शिझान खानची आई आणि त्याची बहीण हे देखील तुनिषा शर्माच्या अंत्यदर्शनाला उपस्थित होते.
#WATCH | TV actor Tunisha Sharma death case | Sister and mother of accused Sheezan Khan also arrived at the crematorium ground in Mira Road area for her last rites. pic.twitter.com/HA0voEOwQr
— ANI (@ANI) December 27, 2022
तुनिषा शर्माचा व्हिडीओ:
तुनिषा शर्माचा एक व्हिडीओ सध्या समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये शिझान खान हा तुनिषाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना दिसत आहे.
BREAKING NEWS | मौत के बाद तुनिषा का पहला वीडियो सामने आया @ShobhnaYadava | @MrityunjayNews | @surajojhaa https://t.co/smwhXUROiK #BreakingNews #TunishaSharma #TunishaSharmaSuicide pic.twitter.com/nAHWd8TQBb
— ABP News (@ABPNews) December 27, 2022
तुनिषा शर्माच्या पार्थिवावर 25 डिसेंबर 2022 रोजी अंत्यसंस्कार होणार होते. पण तिची मावशी मुंबईत नसल्याने अंत्यसंस्कार पुढे ढकलण्यात आले.
अभिनेत्री तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या मालिकेतील तुनिषाचा सहकलाकार आणि तिचा खास मित्र शिझान मोहम्मद खान याच्या विरोधात तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तुनिषा आणि शिझान रिलेशनमध्ये होते. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तुनिषा नैराश्याला बळी पडली होती. तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. तुनिषाच्या निधनानं अनेकांना धक्का बसला.
शिझान खान कोण आहे?
शिझान खानला वसई न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान एक उत्कृष्ट अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणीच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: