Tunisha Sharma Case : तुनिषा शर्मा आणि शिझान खानचा ब्रेकअप कसा झाला? बहिण फलक नाजचा खुलासा
Tunisha Sharma : तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी शिझानच्या बहिणीने पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
Tunisha Sharma Suicide Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून दररोज नवीन अपडेट समोर येत आहेत. नुकतचं शिझानच्या (Sheezan Khan) कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यादरम्यान शिझानच्या बहिणींनी खुलास केला आहे की, तुनिषा आणि शिझानचा ब्रेकअप झाला नव्हता. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पत्रकार परिषदेनंतर शिझानच्या बहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे, पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न विचारले जात होते. त्यांचा ब्रेकअप झाला की नाही झाला हा प्रश्न खूप फिरवून विचारला जात होता. त्यामुळे मी गोंधळात सापडले होते. पत्रकार परिषदेत मी म्हणाले,"दोघांच्या संमतीने एका चांगल्या नोटवर ब्रेकअप झाला होता. त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नव्हते. पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न विचारले त्यामुळे गोंधळ झाला".
View this post on Instagram
पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल
पत्रकार परिषदेतील व्हिडीओमध्ये शिझानची बहिण म्हणत आहे,"नात्यात खटके उडत असतात. जर एखाद्या नात्यात एकाला डिप्रेशनचा सामना करावा लागत असेल तर दुसऱ्याने त्याला समजून घ्यायला हवं. शिझान आणि तुनिषाचा ब्रेकअप झालेला नव्हता". शिझानच्या बहिणीच्या एका व्यक्तव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
चौकशीदरम्यान ब्रेकअपबद्दल शिझान म्हणाला होता, आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. तुनिषाला माझ्यासोबत लग्न करायचं होतं. पण करिअरकडे दुर्लक्ष होत असल्याने मी तुनिषासोबत ब्रेकअप केला. तसेच आमचा धर्मदेखील वेगळा होता". शिझान आणि शिझानच्या बहिणीने वेगवेगळा जबाब दिला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता शिझानच्या बहिणीचीदेखील चौकशी होऊ शकते.
तुनिषा शर्माने 24 डिसेंबर 2022 रोजी 'अली बाबा-दास्तान ए काबुल' या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येला शिझान जबाबदार असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या