Tripti Dimri : 'मेरे मेहबूब' गाण्यावरुन तृप्ती डिमरी ट्रोल, नेटकऱ्यांना आवडला नाही राजकुमार रावसोबतचा डान्स
Vicky Vidya Ka Woh Wala Video : अभिनेत्री तृप्ती डिमरी आगामी चित्रपटातील गाण्यामुळे ट्रोल होत असून तिने ट्रोलर्सचा कडक शब्दात उत्तर दिलं आहे.
Mere Mahboob Song : अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित नावांपैकी एक आहे. ॲनिमल चित्रपटात रणवीर कपूरसोबत सहाय्यक भूमिका करुन तृप्ती डिमरी रातोरात स्टार बनली. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांची ऑफर मिळाल्याचं दिसत आहे. तृप्ती डिमरी अभिनेता राजकुमार राव याच्यासोबत आगामी 'विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं असून नेटकऱ्यांनी यावरुन तृप्तीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
'मेरे मेहबूब' गाण्यावरुन तृप्ती डिमरी ट्रोल
अभिनेत्री तृप्ती डिमरीने कला, लैला, मजनू या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, ॲनिमल चित्रपटातील इंडिमेट सीनमुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी चर्चेत आली. यामुळे ती रातोरात स्टार बनली. त्यानंतर ती गूड न्यूज चित्रपटात झळकली. कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 3' चित्रपटासाठीही तृप्तीची वर्णी लागली आहे. आता ती 'विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटात ती झळकणार असून तिच्या डान्सवरुन तिला ट्रोल केलं जात आहे.
नेटकऱ्यांना आवडला नाही राजकुमार रावसोबतचा डान्स
'विकी और विद्या का वो वाला व्हिडीओ' चित्रपटातील 'मेरे मेहबूब' गाण्यावरुन तृ्प्ती डिमरीला ट्रोल केलं जात आहे. चित्रपटांमध्ये चांगलं काम केल्यानंतर तृप्ती अशाप्रकारच्या डान्स स्टेप का करत आहे, असा सवाल नेटकरी विचारत आहे. काही नेटकऱ्यांच्या मते, तृप्ती डान्स करताना कंर्फटेबल नसल्याचं दिसत आहे. डान्सवरुन तिला ट्रोल करणाऱ्यांना तृप्तीने आता कडक शब्दात उत्तर दिलं आहे. तृप्तीने म्हटलं आहे की, तिला माहित नव्हतं की, यावर अशाप्रकारच्या प्रतिक्रिया येतील.
डान्समुळे ड्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर
अभिनेत्री तृप्ती डिमरीने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, "चुका करणं आणि त्यातून शिकणं हा आयुष्याचा खेळ आहे. माझं पहिलं प्रेम अभिनय किंवा डान्स नव्हतं. कलाकार असताना तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा प्रयत्न करता. एक अभिनेत्री होण्यासाठी फक्त अभिनय येणं गरजेचं आहे, असं मला वाटलं होतं पण तसं नाही. तुम्हाला नीट चालता आलं पाहिजे, डान्स करता आला पाहिजे. तुम्हाला डान्स करण्याची ऑफर मिळाली तर, ते तुम्हाला जमलं पाहिजे".
"प्रयत्न करण्यात काय वाईट आहे?"
हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत तृप्तीला विचारलं गेलं की, गाण्याचं शूटिंग करताना काही चुकीचं होतं आहे, असं तिला त्यावेळी वाटलं होतं का? यावर उत्तर देताना तृप्ती म्हणाली की, "खरोखर, मला तसं काहीही वाटलं नव्हतं. मला सर्व काही करुन पाहायचं आहे. प्रत्येक जण सर्वच गोष्ट चांगल्याप्रकारे करु शकत नाही, पण प्रयत्न करण्यात काय वाईट आहे? मला शूटिंग करताना असं वाटलं नाही. हे माझा पहिला डान्स नंबर होता. मी याआधी कोणताही डान्स नंबर केला नव्हता. मला माहित नव्हतं की, यावर अशा प्रतिक्रिया येतील. पण, ठिक आहे, हे सगळ्यांसोबत होतं. काही गोष्टी लोकांना आवडतात, तर काही गोष्टी आवडतं नाहीत, पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करणं सोडून द्याल".