एक्स्प्लोर
भिंतीवरुन उडी, बिग बींच्या घरात घुसण्याचा प्रयत्न
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केलं आहे. बुलेट बनवारीलाल यादव असं या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे.
बुलेट यादवने सुरक्षा रक्षकांना चकवा देत, बच्चन यांच्या जुहूतील घरात घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट यादवने भिंतीवरुन उडी मारुन प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी पकडल्यामुळे, हा प्रकार उघडकीस आला.
बुलेट यादव हा मूळचा बिहारचा असून, सध्या पुण्यात राहात असल्याचं सांगण्यात येत आहे. तो स्वत: भोजपुरी गायक असल्याचं सांगतो.
अमिताभ बच्चन यांना गाणं ऐकवण्यासाठी आपण ही धडपड केल्याचं त्याने सांगितलं.
दरम्यान, बुलेट यादवविरोधात जुहू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement