एक्स्प्लोर
अखेर नाव बदलून वादग्रस्त 'मेंटल है क्या' चा ट्रेलर रिलीज, 'जजमेंटल है क्या' मध्ये कंगना आणि राजुकमार रावचा जबरदस्त अंदाज
या सिनेमाचा ट्रेलर 19 जून रोजीच रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या नावाला अनेकांनी विरोध केल्यामुळे ट्रेलर लॉन्चिंगची तारीख निर्मात्यांना पुढे ढकलावी लागली होती.
मुंबई: कंगना रनौत आणि राजकुमार राव अभिनित बहुप्रतीक्षित आणि वादग्रस्त चित्रपट 'जजमेंटल है क्या' चा ट्रेलज रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कंगना आणि राजकुमार या दोघांच्याही अनोख्या अभिनयाची छाप पाहायला मिळत आहे. 'मेंटल है क्या?' चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे सिनेमाचे नाव बदलून ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सिनेमाचा ट्रेलर 19 जून रोजीच रिलीज होणार होता. मात्र चित्रपटाच्या नावाला अनेकांनी विरोध केल्यामुळे ट्रेलर लॉन्चिंगची तारीख निर्मात्यांना पुढे ढकलावी लागली होती.
'ट्रस्ट नो वन'अर्थात कुणावरही विश्वास ठेवू नका अशी टॅगलाईन असलेला हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. सिनेमाच्या कथेत कंगना आणि राजकुमार हे एका खुनामध्ये संशयित आरोपी असल्याचे निदर्शनास येत आहे. सिनेमात दोघेही काहिशे विक्षिप्त असल्याचंही दिसून येत आहे.
चित्रपटात कंगनाच्या कॅरेक्टरचे नाव 'बॉबी' तर राजकुमार यावं 'केशव' नावाच्या इसमाची भूमिका करत आहे. यामध्ये बॉबी बोल्ड अंदाजात दाखवली आहे तर राजकुमार राव एक सामान्य व्यक्तिरेखा रेखाटत आहे. एका दुहेरी हत्येच्या प्रकरणात पोलिसांना बॉबी आणि केशववर संशय असतो. यावर आधारीत ही कथा असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे.
रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रोमांस, कॉमेडी आणि सस्पेंसचा जोरदार तडका दिला आहे. हा चित्रपट एकटा कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सची निर्मिती आहे तर चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कोवेमालुदी ने केलं आहे. आगामी 26 जुलै रोजी हा सिनेमा संपूर्ण देशभरात रिलीज होणार आहे.
काय होता वाद?
एकता कपूरच्या 'मेंटल है क्या?' या सिनेमाचे पोस्टर एप्रिलमध्ये रिलीज झाले होते. यानंतर चित्रपटाच्या नावाला मानसोपचार तज्ज्ञांनी विरोध दर्शवला होता. दरम्यान, हा चित्रपट मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या प्रती संवेदनशील असल्याचं एकतानं सांगितलं होतं. या चित्रपटात कोणत्याही प्रकारे मानसिक आजार असलेल्या समाजाला कमी लेखण्यात आलेलं नाही. तसंच चित्रपटाच्या नावावरून कुणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. हा चित्रपट मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या बाबत संवेदनशील आहे. आपल्यातील वेगळेपणाचा आनंद घेण्यासाठी आणि आपलं व्यक्तिमत्व स्वीकारण्यासाठी हा फिक्शनल थ्रीलर चित्रपट प्रोत्साहित करतो, असं एकतानं एका ट्विटमध्ये म्हटलं होतं.
पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं
एखाद्या चित्रपटाचं नाव असं असणं असंवेदनशील असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. चित्रपटाचं नाव बदलण्यासाठी डॉक्टरांनी सोशल मीडियावर मोहीम देखील सुरू केली होती. इंडियन सायकॅट्री असोसिएशनने सेन्सॉर बोर्ड आणि पंतप्रधान मोदींना पत्र देखील लिहिलं होतं. तसंच याबाबत कोर्टात जनहित याचिका देखील दाखल केली होती.
पाहा ट्रेलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement