एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या - 

एकतर्फी प्रेमाची कथा घेऊन येतोय अर्जुन आणि जॉन... ‘एक व्हिलन रिटर्न्स’चा ट्रेलर आऊट

बॉलिवूडच्या बहुचर्चित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूरचा हा सिनेमा एकतर्फी प्रेमावर भाष्य करणारा आहे. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने प्रेक्षक सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

'कोण होणार करोडपती'चा कर्मवीर विशेष भाग रंगणार शनिवारी

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. या आठवड्यात  ‘कोण होणार  करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘कर्मवीर विशेष भागात' कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत.

देशातच नाही तर विदेशातही 'भूल भुलैया 2' ब्लॉकबस्टर

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील नोन इंग्लिश विभागात या सिनेमाने जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. हा रेकॉर्ड करणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. 

‘कन्याकुमारी’ची लगीनघाई; वैशाली सामंतचा नवा अल्बम लवकरच होणार रिलीज

आपल्या सुमधुर स्वरांनी असंख्य सुपरहीट गाणी देणारी आघाडीची गायिका वैशाली सामंतची सध्या लगीनघाई सुरु आहे. तुम्हाला ही प्रश्न पडला असेलच ना!! ही लगीनघाई नेमकी कोणाची आहे? तर वैशालीची ही लगीनघाई ‘कन्याकुमारी’च्या लग्नासाठी आहे. व्हिडिओ पॅलेस प्रस्तुत ‘कन्याकुमारी’ या सोलो अल्बमसाठी वैशाली हिने आपला स्वरसाज दिला आहे. लवकरच हा अल्बम प्रकाशित केला जाणार आहे. अभिनेत्री दिशा परदेशी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे.

दिशा पाटणी अन् जॉन अब्राहमची जमली जोडी! ‘एक व्हिलन रिटर्न्स’चं धमाकेदार पोस्टर पाहिलंत का?

'एक व्हिलन रिटर्न्स' हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘एक व्हिलन’ हा चित्रपट तब्बल 8 वर्षांपूर्वी रिलीज झाला होता आणि आता या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'एक व्हिलन रिटर्न्स'चे काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत.  या पोस्टरमध्ये दिशा पाटणी आणि जॉन अब्राहमचा जबरदस्त लूक दिसला आहे. त्यांचा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. यासोबतच आता चित्रपटाचा ट्रेलर आणि रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत नवं वळण

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणार असून स्वरा आणि तिच्या बाबांची भेट होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चिमुकल्या स्वराने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलं. एकीकडे आईला गमावल्याचं दु:ख तर दुसरीकडे मामीकडून होणारा जाच. यासर्वात स्वराने मामाच्या सांगण्यावरुन वेष बदलून बाबांचा शोध घेण्यासाठी मुंबई गाठली. अशातच आता 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. 

आधी ‘दबंग’ सलमान खान, आता अभिनेत्री स्वरा भास्करलाही जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र!

अलीकडेच बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे अभिनेत्याला ही धमकी देण्यात आली होती. या बातमीने अवघ्या मनोरंजन विश्वात खळबळ उडाली होती आणि पोलीसही या प्रकरणाचा तपासात करत आहेत. सलमान खाननंतर आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील बेधडक अभिनेत्री स्वरा भास्कर हिलाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्रीला तिच्या घरी स्पीड पोस्टद्वारे एक पत्र मिळाले आहे, ज्यामध्ये तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.

बुशरासोबत रोमँटिक झाला मिका सिंह, ‘स्वयंवर’चा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक मिका सिंहचा ‘स्वयंवर: मिका दी वोटी’ हा शो टीव्हीवर प्रसारित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मिका सिंहसोबतच आता त्याच्या चाहत्यांनाही गायकाच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. आता लवकरच मिकाला त्याची आयुष्यभराची जोडीदार मिळणार आहे. मिकाच्या स्वयंवरात एकूण 12 तरुणी सहभागी झाल्या होत्या, ज्यातील काही आता एलिमिनेशनमध्ये बाहेर पडल्या आहेत. मात्र, नुकताच आता या शोचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यात मिका चक्क रोमँटिक होताना दिसला आहे.

'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने एकनाथ शिंदेंना दिल्या शुभेच्छा

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतली आहे. आज (30 जूनला) त्यांचा शपथविधी पार पडला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मनोरंजनसृष्टीतील मंडळीदेखील नव्या सरकारला शुभेच्छा देत आहेत. यात प्रसाद ओक, शरद पोंक्षे, आरोह वेलणकरसह अनेक कलाकारांचा सहभाग आहे. 'धर्मवीर'ची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर करत एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'हा चित्रपट मास्टरपीस आहे'; हॉलिवूड स्टार जोसेफ मॉर्गनकडून आरआरआरचं कौतुक

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा चित्रफट ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामध्ये राम चरण, जूनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगन या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमधील कलाकारांची  देखील मनं या चित्रपटानं जिंकली. 'द वॅम्पायर डायरीज' मधील अभिनेता जोसेफ मॉर्गन आणि त्याची पत्नी पर्सिया व्हाइट यांनी आरआरआर या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 25 February 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सThreat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 25 February 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMassajog Protest : संतोष देशमुखांच्या न्यायासाठी एल्गार, मस्साजोग ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Threat Call Indrajeet Sawant : डॉ.प्रशांत कोरटकर यांच्या नावाने इंद्रजित सावंतांना धमकी देऊन शिवीगाळ
Prajakta Mali Mahashivratra Program:  त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीचा 'शिवस्तुती नृत्याविष्कार' कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात; सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही, माजी विश्वस्तांकडून आक्षेप
Neelam Gorhe: एकीकडे ठाकरे गटातील नेते तुटून पडले दुसरीकडे शिंदे गटातील नेतेही नीलम गोऱ्हेंवर नाराज,  म्हणाले...
विनाकारण पक्ष डॅमेज झाला! शिंदे गटातील नेते नीलम गोऱ्हेंवर नाराज, एकनाथ शिंदेंकडे महत्त्वाची मागणी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 1500 रुपये आजपासून मिळणार, महिला व बाल विकास विभागानं उशीर होण्याचं कारण सांगितलं...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे आज येणार, तुमचं बँक अकाऊंट फटाफट चेक करा
Thane Crime: ठाण्यात गतीमंद मुलीला वेदना असह्य, आई अन् आजीने गुंगीच्या गोळ्या देऊन मारुन टाकलं, साताऱ्यातील गावी नेऊन अंत्यसंस्कार उरकले
गतिमंद मुलीच्या वेदना पाहावल्या नाहीत, आई -आजीने झोपेच्या गोळ्या देऊन कायमचं 'शांत' केलं; ठाण्यातील घटना
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी होणार सुनावणी; आमदार अपात्रतेला स्थगिती मिळणार?
Kanifnath Yatra : कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
कानिफनाथ यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, ग्रामसभेच्या ठरावानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल, ग्रामसेवकाला धाडली नोटीस
Share Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
गुंतवणूकदारांसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ब्लॅक डे ठरला, 435000 कोटी बुडाले, FPI कडून जोरदार विक्री सुरुच
Embed widget