TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
'पावनखिंड' चित्रपटाची यशस्वी घौडदौड
बाजीप्रभूंची गाथा सांगणाऱ्या ‘पावनखिंड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. या चित्रपटाला पहिल्याच दिवशी महाराष्ट्रभरात तब्बल 1500 हून अधिक शो मिळाले. एकच दिवसात इतके शो मिळवणारा ‘पावनखिंड’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सिनेमागृहांबाहेर ‘हाऊसफुल’चे बोर्ड झळकले आहेत.
‘गंगूबाई काठियावाडी’वर बंदी घाला! कामाठीपुरातील नागरिकांची मागणी
बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री आलिया भट्ट यात मुख्य भूमिका साकारात आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाला चौफेर विरोध होताना दिसतोय. ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या विरोधात आज कामाठीपुरा येथील स्थानिक नागरिकांनी बॅनर, पोस्टर हाती घेऊन घोषणाबाजी केली. चित्रपटात जसे कामाठीपुराचे चित्रण करण्यात आले आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचा आरोप या लोकांनी केला आहे.
‘पुष्पा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाने रिलीज होऊन अनेक विक्रम केले आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, असे असूनही चित्रपटाची जादू अद्याप कमी होताना दिसत नाही. रिलीजसोबतच चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडत आणखी एक नवा टप्पा गाठला आहे. ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने 9 आठवड्यातही तब्बल 1.39 कोटींची कमाई केली आहे. या बक्कळ कमाईसह, ‘पुष्पा’ हा चित्रपट 9व्या आठवड्यात इतकी कमाई करणारा देशातील दुसरा चित्रपट ठरला आहे.
टायगर श्रॉफने शेअर केला 'Poori Gal Baat'चा टीझर
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस आणि डान्समुळे चर्चेत आहे. अशातच त्याने त्याच्या नव्या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. 'पुरी गल बात' असे या गाण्याचे नाव आहे. लवकरच टायगरची अनेक रोमॅंटिक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. टायगरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये टायगर श्रॉफ मौनी रॉयसोबत रोमान्स करताना दिसत आहे.
राजकुमारने पत्रलेखाला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच ते लग्नबंधनात अडकले आहेत. आज पत्रलेखाचा वाढदिवस आहे. त्यामुळे राजकुमारने पत्रलेखाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा फोटो शेअर करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले आहे,"पत्रलेखा, वाढदिवसाच्या शुभेच्छा..आय लव्ह यू". राजकुमारच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते कमेंट्स करत पत्रलेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत".
संबंधित बातम्या
Disha Patani : दिशा पटानीच्या 'एक व्हिलन रिटर्न्स'चे शूटिंग पूर्ण, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Boss Mazi Ladachi : खडूस बॉसच्या भूमिकेसाठी भाग्यश्री लिमये नव्हे 'या' अभिनेत्रीला मिळाली होती ऑफर
Kangana Ranaut : कंगना रनौतने आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमावर साधला निशाणा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha