एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक

दिवंगत गायक सिद्धू मुसेवाला हत्याप्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला परदेशातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलं आहे. 

अभिनेता कमाल आर खानला मुंबईत अटक

वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खान उर्फ केआरकेला अटक करण्यात आली आहे.  2020 साली त्यानं एक ट्वीट केलं होतं. या प्रकरणी मालाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन वर्षांनंतर केआरके हा मुंबईत पोहचला होता. त्यावेळी मुंबई विमानतळावरून पोलीसांनी त्याला अटक केली. त्याला आज बोरिवली कोर्टात हजर करण्यात येईल. 

गणेशोत्सवातही साऊथच्या सिनेमांची क्रेझ

 गणपती बाप्पाच्या आगमनाची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. मखर, सजावट, फुलांचा हार, प्रसाद अशा अनेक गोष्टींची सध्या घरोघरी तयारी सुरू आहे. दोन वर्षांनंतर बाप्पाचं थाटामाटात स्वागत करण्यात येत आहे. त्यामुळे सजावटीचे वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. आजही सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहे. कारण गणेशोत्सवात 'पुष्पा' स्टाइल बाप्पाची मुर्ती बनवण्यात आली आहे. 

'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

फुल्ल ऑफ अ‍ॅक्शन, कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' चित्रपटाच्या मोशन पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच हवा केलीय. प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

दिलजीत दोसांझच्या 'जोगी' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या जोगी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे कथानक हे 1984 दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीवर आधारित असणार आहे. दंगली दरम्यान झालेली हिंसा आणि लोकांना होणारा त्रास याचं दृष्य ट्रेलरमध्ये दिसत आहे. 

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' ओटीटीवर होणार रिलीज

हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थ गेल्या काही दिवसांपासून 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यश-नेहाच्या नात्यात दुरावा

'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता यश-नेहाच्या नात्यात दुरावा आला आहे. 

'रूप नगर के चीते' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

लालबागच्या राजाच्या चरणी 'रूप नगर के चीते' या मराठी सिनेमाच्या  कलाकारांनी नुकतीच हजेरी लावली आहे.  सिनेमाच्या यशासाठी त्यांनी बाप्पाचा आशिर्वाद घेतला आहे. हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत आणि 'लालबागचा राजा'च्या जयघोषात आपल्या सिनेमाचे नवीन पोस्टर याप्रसंगी बाप्पाच्या चरणी अर्पण केले. 16 सप्टेंबरला 'रूप नगर के चीते' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाच्या प्रमोशनच्या धामधुमीत लालबागच्या राजाच्या प्रथम दर्शनाची संधी कलाकारांनी सोडली नाही.

'मोनिका ओ माय डार्लिंग'चा टीझर आऊट

बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावचा आगामी सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' असे या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

'कार्तिकेय-2' चा बॉक्स ऑफिसवर जलवा

 कार्तिकेय 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत.  कार्तिकेय 2  या चित्रपटात साऊथ सुपरस्टार निखिल सिद्धार्थनं प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी कार्तिकेय 2 च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Javed Akhtar Speech MNS Program : मनसेचा मराठी भाषा दिननिमित्त कार्यक्रम, जावेद अख्तर यांचं भाषण, कोणती कविता केली सादर?ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 27 February 2025Vicky Kaushal Marathi Bhasha Din Poem | मराठी भाषा निमित्ताने विकी कौशल यांने सादर केली 'कणा' कविताSpecial Report | Swargate Crime Accuse | ताफा भलामोठा, नराधम बेपत्ताच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
उत्तर प्रदेशातील बेपत्ता तरुणीची प्रियकरांकडूनच हत्या, मुंबई पोलिसांकडून एका दिवसात उलगडा
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
अजितदादांच्या पदाधिकाऱ्याचं पितळ उघड, जन्मदात्या आईलाच केली मारहाण, नंतर खोटा दावाही केला
Kolhapur News : आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
आता कोल्हापुरातही बंदुकीचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार, शरीर संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Dattatray Gade :नराधम दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळा घटनाक्रम सांगितला...
दत्तात्रय गाडेपर्यंत पुणे पोलीस कसे पोहोचले? गुनाट गावच्या पोलीस पाटलानं सगळं सांगितलं
Dattatray Gade Arrested : मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश, गुनाटच्या गावकऱ्यांची पोलिसांना साथ
मोठी बातमी, नराधम दत्तात्रय गाडेला अटक, मध्यरात्री पुणे पोलिसांना मोठं यश
Ukraine Rare Minerals : युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले, दुर्मिळ खनिजांचा सौदा होणार!
युरोप, अमेरिकेनं हवा भरली, पण युक्रेनची पार राखरांगोळी झाली, अन् आता ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना हुकूमशहा म्हणत फक्त 37 दिवसात गुडघ्यावर आणले!
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
मोहोळमध्ये बेकायदा वाळू उपसा बंद होते, मग पंढरपुरात का नाही? आमसभेत 2 आमदारांमध्ये खडाजंगी 
EPFO 31 मार्च पर्यंत महत्त्वाचं एक काम पूर्ण करणार, जूनपासून बँकिंग प्रमाणं सेवा मिळणार, पैसे काढणं सोपं होणार
EPFO 3.0 चं काम 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार, जूनपासून बँकिंगप्रमाणं सेवा देणार, पीएफ काढणं सोपं होणार
Embed widget