एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

Koffee With Karan : 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीझनला होणार सुरुवात; प्रोमो आऊट

सिने निर्माता करण जोहरचा 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाचा सातवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो करणने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. 

केतकीच्या केस डायरीतून 'ते' कलम हटवले; राष्ट्रीय महिला आयोगाच्या सवालानंतर पोलिसांची कारवाई

बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर केतकीला अटक करण्यात आली. आता केतकी विरुद्धच्या खटल्याचा तपास पोलीस करत आहेत.  केतकीविरुद्धच्या खटल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केस डायरीतून माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याचे कलम 66 अ काढून टाकले. 

'झिम्मा'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता 27 तारखेला टीव्हीवर दिसणार

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'झिम्मा' सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 26 जूनला या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. 26 जूनला दुपारी एक वाजता प्रवाह पिक्चरवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. 

वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर... 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार 'जुग जुग जिओ' सिनेमातील कलाकार

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात सिनेमाच्या, नाटकाच्या प्रमोशनसाठी कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते येत असतात. हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांचे प्रमोशनदेखील 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर केले जाते. या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'जुग जुग जिओ' सिनेमातील कलाकार हजेरी लावणार आहेत. 

कार्तिक आर्यनचा सुपरहिट चित्रपट ‘भूल भुलैया 2’ ओटीटीवर रिलीज!

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर 'भूल भुलैया 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अजूनही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. कियारा अडवाणीसोबतची त्याची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडली आहे.

कमल हासनच्या ‘विक्रम’चा नवा महाविक्रम! प्रभासच्या ‘बाहुबली’लाही टाकले मागे..

अभिनेते कमल हासन यांचा 'विक्रम' हा चित्रपट दिवसेंदिवस नवनवे रेकॉर्ड मोडत आहे. ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ उलटला आहे. दोन आठवड्यानंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. विशेषत: तामिळनाडूमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. या चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 150 कोटींची कमाई केली आहे. हा या चित्रपटाचा एक नवा विक्रम आहे. ‘विक्रम’ चित्रपटाच्या आधी एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' ने हा पराक्रम केला होता. मूलतः तेलुगूमध्ये बनलेल्या 'बाहुबली 2' ने राज्यात 146 कोटींची कमाई केली होती.

करण जोहरकडून पाच कोटीची खंडणी वसूल करण्याचा डाव होता; बिश्नोई गँगच्या महाकालचा गौप्यस्फोट

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. बिश्नोई गँगचा कथित सदस्य सिद्धेश कांबळे उर्फ महाकाल याची सध्या पोलीस चौकशी करत आहेत. चौकशी दरम्यान सिद्धेश एक गौप्यस्फोट केला आहे. सिद्धेशनं सांगितलं की, बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचं नाव सामील होतं. करण जोहरकडून पाच कोटींची खंडणी वसूल करण्याची तयारी होती अशी माहिती महाकालनं दिली, असं शनिवारी (18 एप्रिल) पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सिद्धेश कांबळे उर्फ महाकालनं केलेल्या या दाव्यांची अजून पुष्टी करण्यात आलेली नाही. 

बॉक्स ऑफिसवर 'मेजर'चा धमाका; विकेंडला केली दुप्पट कमाई

'मेजर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली होती. पण विकेंडला या सिनेमाने दुप्पट कमाई केली आहे. शुक्रवारी या सिनेमाने 27 लाखांची कमाई केली आहे. तर शनिवारी या सिनेमाने थेट 55 लाखांची कमाई केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 11.51 कोटींची कमाई केली आहे. 

अनुष्का शर्माच्या 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अनुष्का  ‘झिरो’ सिनेमात शेवटची दिसली होती. अनुष्काने मुलीच्या जन्मानंतर काही वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. पण 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमाच्या माध्यमातून अनुष्का आता कमबॅक करणार आहे. 

‘सुजल द वोर्टेक्‍स’ सीरिज रिलीज

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता चित्रपटांबरोबरच दाक्षिणात्य वेब सीरिज देखील प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. नुकतीच  ‘सुजल द वोर्टेक्‍स’ ही तमिळ सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सारिजचं बॉलिवूडमधील आणि टॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कौतुक केलं. या सीरिजमध्ये  कथिर, ऐश्‍वर्या राजेश, श्रिया रेड्डी आणि राधाकृष्णन पार्थिबनलीड या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
Embed widget