Top 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Top 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
Top 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
कान्स चित्रपट महोत्सवात सत्यजित रे यांच्या 'प्रतिद्वंदी' सिनेमाचे होणार विशेष स्क्रीनिंग
भारत यंदाच्या कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणार आहे. यंदा 17 मे ते 28 मे या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. सत्यजित रे यांचा 'प्रतिद्वंदी' हा सिनेमा यंदा कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.
'हरिओम' चित्रपट 10 जूनला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
भगवे वादळ निर्माण करणाऱ्या मावळ्यांवर आधारित श्रीहरी स्टुडीओज प्रस्तुत 'हरिओम' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 10 जून रोजी तो चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्वराज्याच्या भगव्या स्वप्नातून जन्म घेणाऱ्या नव्या युगातील मावळ्यांची कथा सिनेमात दाखवण्यात येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत.
'फर्स्ट सेकंड चांस' सिनेमाचे पोस्टर आऊट
'फर्स्ट सेकंड चांस' या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिनेमात 'हम आपके हैं कौन' फेम रेणुका शहाणे रोमॅंटिक अंदाजात दिसणार आहेत. रेणुका शहाणे आणि अनंद महादेवन या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचे पोस्टर चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
नेटफ्लिक्सवरदेखील आलिया भट्टचा बोलबाला
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चर्चेत आहे. नुकताच आलियाचा गंगूबाई काठियावाडी सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. आता नेटफ्लिक्सवरदेखील या सिनेमाने रेकॉर्ड केला आहे. आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी दिली आहे. आलियाचा गंगूबाई काठिवाडी सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिकसवरील पहिला नॉन इंग्लिश सिनेमा ठरला आहे.
'पृथ्वीराज'चं नवं पोस्टर रिलीज
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार गेली 30 वर्ष बॉलिवूड इंड्रीमध्ये काम करत आहे. अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यानिमित्त यश राज फिल्म्सनं पृथ्वीराज या चित्रपटाचं नवं पोस्टर लाँच केलं. हे पोस्टर खास आहे कारण या पोस्टरचं डिझाइन अक्षयच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांच्या फोटोपासून तयार करण्यात आलं आहे.
'इंडियन आयडल' फेम जगदीश चौहान 'विजयी भव'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
खेळ आणि राजकारण यांची अचूक सांगड घालणारा 'विजयी भव' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणाच्या पटलावर रंगलेला कबड्डीचा डाव 'विजयी भव' या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्यामुळं केवळ खेळ एके खेळ असं चित्र यात दिसणार नसून, राजकारणातील डावपेचही 'विजयी भव'मध्ये असणार यात शंका नाही. आपल्या बहारदार गायकीनं इंडियन आयडल मराठीचा मंच गाजवणारा जगदीश चौहान या चित्रपटाचं मुख्य आकर्षण ठरणार आहे.
10 जूनला 'फनरल' येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आंतरराष्ट्रीय पातळीवर 'फनरल' या सिनेमाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 जूनला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या सिनेमात आहेत.
'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन ओटीटीवर येणार
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमाच्या सातव्या सीझनची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. आता हा कार्यक्रम प्रेक्षक ओटीटीवर पाहू शकतात.
टायगरच्या 'हीरोपंती' समोर टिकला नाही अजयचा 'रन-वे 34'
अभिनेता टायगर श्रॉफचा हीरोपंती-2 आणि अजय देवगणचा 'रनवे 34' हे दोन्ही चित्रपट 29 April 2022 रोजी प्रदर्शित झाले. दोन्ही चित्रपटांमध्ये दमदार स्टार कास्ट आहे. अजयच्या 'रनवे 34' पेक्षा टायागरच्या 'हीरोपंती-2' नं बॉक्स ऑफिसवर जास्त कलेक्शन केलं.
'सरनोबत' सिनेमाचे मोशन पोस्टर आऊट
'सरनोबत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सरनोबत' अर्थात वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होत नाही. अशाच शूरवीरांच्या गाथेला उजाळा देण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या