TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज!
बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व नुकतेच संपले आहे. त्यामुळे बिग बॉसचे चाहते हा कार्यक्रम मिस करत आहे. दरम्यान बिग बॉस मराठीच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन लवकरच सुरू होणार आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 10 जुलैनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आदित्य सरपोतदार यांच्या ‘उनाड’ची आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड
जिओ स्टुडिओज आणि प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट 'उनाड' हा चेक प्रजासत्ताक येथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा 62 व्या झ्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, युवा विभागात फिचर फिल्म्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. 26 मे ते 1 जून 2022 दरम्यान चेक रिपब्लिकमध्ये हा महोत्सव होणार आहे.
कंगनानं घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट
अभिनेत्री कंगना रनौत चित्रपटांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आसते. कंगनानं शेअर केलेल्या पोस्ट नेहमी नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतीच कंगनानं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. कंगनानं याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आमिरच्या लेकीनं पाहिला 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपट
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली होती. 26 एप्रिल रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. नुकताच हा चित्रपट आमिर खानची मुलगी आयरा खाननं पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर इरानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
किंग खानच्या 'पठाण'चे डिजिटल हक्क कोट्यवधींत विकले
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी 'पठाण' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा 2023 मध्ये रिलीज होणार असला तरी शाहरुखने या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. दरम्यान 'पठाण'च्या डिजिटल हक्कांची कोट्यवधींत डील झाली आहे. 'पठाण'च्या निर्मात्यांनी या सिनेमाच्या हक्कांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमसोबत 200 कोटींचा करार केला आहे.
'भूल भुलैया 2' चा टायटल ट्रॅक रिलीज
'भूल भुलैया 2' चा टायटल ट्रॅक नुकताच रिलीज झाला आहे. यात कार्तिक आर्यनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. कार्तिकच्या नृत्याने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. हे टायटल ट्रॅक नीरज श्रीधर यांनी गायले आहे. तर तनिष्क बागची आणि प्रीतम यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.
'सरकारु वारी पाटा'चा ट्रेलर रिलीज
सध्या दाक्षिणात्य सिनेमे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. लवकरच महेश बाबूंचा 'सरकारु वारी पाटा' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. 'सरकारु वारी पाटा' सिनेमात महेश बाबू अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे.
'द कपिल शर्मा शो' वादाच्या भोवऱ्यात
छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. ही विनोदी मालिका पुन्हा एकदा वादात अडकली आहे. मीरा रोडबद्दल आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे मीरा रोडमधील एका समाजसेवकाने शो विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कपिल शर्मानं माफी मागावी अशी मागणी केली आहे.
अजयच्या ‘रनवे 34’चं बॉक्स ऑफिसवर ‘क्रॅश लँडिंग’
अभिनेता अजय देवगण यांचा ‘रनवे 34’ हा हा चित्रपट रिलीज झाला आहे. पण, बॉक्स ऑफिस ट्रॅकवर त्याचा प्रवास तितकासा सोपा दिसत नाहीय. ‘रनवे 34’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष जादू दाखवू शकलेला नाही. पहिल्या दिवशी अजय देवगण आणि अमिताभ बच्चन यांच्या या चित्रपटाने 3.50 कोटींची ओपनिंग केली होती. ‘रनवे 34’चे हे कलेक्शन टायगर श्रॉफच्या ‘हिरोपंती 2’पेक्षा खूपच कमी होते. आता दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने संथगतीने कमाई सुरु ठेवली आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच धर्मेंद्र यांनी शेअर केला व्हिडीओ
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय अभिनेते धर्मेंद्र यांना गेल्या आठवड्यात तब्येतीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर काल (1 मे) रात्री त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी परतल्यानंतर त्यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी ‘मी धडा शिकलो..’, असं म्हणतं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.