Toolsidas Junior Trailer : संजय दत्तच्या 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर आऊट
Toolsidas Junior Trailer : 'तुलसीदास ज्युनियर' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Toolsidas Junior Trailer : 'तुलसीदास ज्युनियर' (Toolsidas Junior) सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिवंगत राजीव कपूर (Rajiv Kapoor), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि बालकलाकार
वरुण बुद्धदेव प्रमुख भूमिकेत आहेत.
टी-सीरीजच्या यूट्यूब चॅनलवरून सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शनच्या 'तुलसीदास ज्युनियर' या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी केली आहे. मृदुलने या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
View this post on Instagram
शुक्रवारी 'बच्चा है फाड देगा' असे म्हणत सिनेमाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले आहे. सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये संजय दत्त, राजीव कपूर आणि वरुण बुद्धदेव स्नूकर खेळताना दिसत होते. 'तुलसीदास ज्युनियर' हा एक क्रिडाविषयक सिनेमा असून संजय दत्त या सिनेमात स्नूकर परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi : इमान..धर्म...धंदा.. रहिमलाला येतोय, अजय देवगणच्या पात्राची पहिली झलक
Farhan Shibani Wedding Photo : शुभमंगल सावधान! फरहान-शिबानी अडकले लग्नाच्या बेडीत, 'या' खास पद्धतीने केलं लग्न
Bal Shivaji : छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास, रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' चित्रपट डोळ्यासमोर उभा करणार स्वराज्याचा पाया!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha