एक्स्प्लोर

Thor Love And Thunder : रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'थोर लव्ह अॅन्ड थंडर'चा धुमाकूळ; भारतात केली रेकॉर्डब्रेक कमाई

Thor Love And Thunder Box Office : मार्वल स्टूडिओचा 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Thor Love And Thunder Day 1 Collection In India : हॉलिवूड सुपरस्टार क्रिस हेम्सवर्थचा (Chris Hemsworth) 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love And Thunder) हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 

Thor Love And Thunder रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा 7 जुलैला भारतात प्रदर्शित झाला आहे. मार्वल स्टूडिओजच्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता हा सिनेमा रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 18.60 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाने 2017 साली रिलीज झालेल्या थोर-रेगनरॉक या सिनेमालादेखील मागे टाकलं आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 7.77 कोटींची कमाई केली होती. आता क्रिस आणि तायका वेट्टीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'थोर लव्ह अॅन्ड थंडर' या सिनेमाची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली होती. 

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' सोशल मीडियावर चर्चेत

'थोर लव्ह अॅन्ड थंडर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सचा हा 29 वा सिनेमा आहे. या सिनेमात थोर अॅक्शनसह रोमॅंटिक अंदाजातदेखील दिसणार आहे. हा सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. टायका वायटीटीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाचे काम केलं आहे. 

संबंधित बातम्या

Vikram Hospitalized : दाक्षिणात्य अभिनेता विक्रमची प्रकृती खालावली; चैन्नईतील रुग्णालयात दाखल

Pravin Tarde : प्रवीण तरडेंना यंदाच्या शाहीर दादा कोंडके पुरस्काराने सन्मानित; खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
कलाकारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही, तुकाराम मुंढेंचं आश्वासन, चित्रीकरण स्थळांवरील अन्नाच्या गुणवत्तेबाबत राष्ट्रवादीचं निवेदन 
Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget