The Family Man 3 : 'द फॅमिली मॅन 3'ची प्रतीक्षा संपली; नोव्हेंबरमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला
The Family Man : 'द फॅमिली मॅन 3' ही वेबसीरिज लवकरच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
The Family Man 3 : मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमांसह त्यांनी अनेक वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्यांची 'द फॅमिली मॅन' ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. 'द फॅमिली मॅन' चे दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man 3) वेबसीरिजची प्रतीक्षा करत होते. या वर्षाच्या शेवटी ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनमध्ये प्रेक्षकांना थरार नाट्य अनुभवायला मिळणार आहे. राज निदिमोरू, कृष्णा डी.के आणि सुमन कुमारने या सीरिजच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर मनोज वायपेयी, प्रियामणी, शारीब हाशमी आणि श्रेया धनवंतरी या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.
View this post on Instagram
'द फॅमिली मॅन 3' लवकरच होणार रिलीज
'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीझनमध्ये तिसऱ्या सीझनवर भाष्य करण्यात आले. या सीझनची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. लवकरच ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नोव्हेंबर महिन्यात होणार प्रीमिअर
मीडिया रिपोर्टनुसार, 'द फॅमिली मॅन 3' या वेबसीरजचा प्रीमिअर नोव्हेंबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. 2019 साली अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'द फॅमिली मॅन'चा पहिला सीझन रिलीज झाला होता. 'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनमध्ये शारीब हाश्मी, प्रियामणी, श्रेया धन्वंतरी आणि शरद केळकर दिसले होते. तर दुसऱ्या सीझनमध्ये समंथा रुथ प्रभू दिसली होती. त्यामुळे तिसऱ्या सीझनमध्ये कोणते कलाकार असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या